औरंगाबाद : मी बाबरी पडायला गेले होते आणि लवकरच राम मंदिर बांधायला जाणार आहे, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे. त्या औरंगाबादमध्ये  पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सध्या देशात चांगलं काम सुरु असल्याचाही दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला. शिवाय, मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देश हितासाठी काहीही करायची तयारी  आहे, असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले.

आपण दुर्लक्षित नसल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने षडयंत्र रचलं आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांनी केला. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी होत्या. त्याप्रकरणी त्यांनी काही वर्ष तुरुंगवासही भोगला. मात्र हे काँग्रेसचं षडयंत्र होतं, असा आरोप त्यांनी केला.