सांगली : युतीचा धर्म आणि मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून मी भाजपचा प्रचार करत आहे. आमची महायुती असल्याने ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या पक्षाचे उपरणं घालणं, हा फार जुना संकेत आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. ते आज सांगलीत बोलत होते.
आम्ही निवडणुका जर एकत्र लढवतो तर व्यासपीठावर येण्यात गैर काय आहे, असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींसोबत असलेल्या वादाला दुजोरा दिला. काल सांगलीतल्या कवलापूरमध्ये सदाभाऊंनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मी मंत्री म्हणून काम पहातोय. त्यामुळे आम्ही एका घरात राहत असतो. त्यामुळे मी कुठेही दूर-जवळ जातो याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असेही सदाभाऊ म्हणाले.
सदाभाऊ खोत कुठल्याही परिस्थितीत भाजपचा प्रचार करणार नाहीत असं राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं. त्याला सदाभाऊंनी हरताळ फासला.
राजू शेट्टी हे आमच्या चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात पक्षनेतृत्वाला सगळं काही माफ असतं. शेट्टींबाबत मी योग्यवेळी बोलेन असंही सदाभाऊंनी सांगितली.