मुंबई : मी भाजपा सोडत आहे या वावड्या कुठून आल्या? असा प्रश्न भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. मी नाराज नाही आणि मी पक्ष सोडावा यासाठी जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जातात असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथ गडावरच्या भाषणापूर्वी एबीपी माझाला दिलेल्या सुपर एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी अनेक खळबळजनक दावे केलेत. एवढंच नव्हे तर पदासाठी पक्षातल्या कुठल्याही वरिष्ठांशी चर्चा सुरु नसल्याचंही पकंजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपची सत्ता असतानाही विरोधीपक्षनेता अर्थात धनंजय मुंडे शक्तिवान झाल्याची खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली.

अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या फडणवीसांच्या निर्णयावरही पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. विचारधारा मानणाऱ्याचं मोठं नुकसान झालं असून नव्या सरकरावर टीका करणार नसल्याचं मत पंकजा मुंडेंनी मांडल आहे. इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? मुंडे साहेबांनी भाजपला जवळून पाहिलं आहे. आता पक्ष बराच मोठा झाला आहे. मधल्या काळात जे पक्षात चाललय ते मुंडे साहेबांना आवडल असत का ? असे विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेब पक्ष वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. जर कोणी दुखवत असेल तर त्याला पहिलं जवळ करायचे.

Pankaja Munde | केंद्रात नव्हे तर राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे | ABP Majha



पंकजा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रात पक्षाला जे यश मिळाले नाही त्याची देवेंद्र फडणवीस सारी जबाबदारी घ्यायला हवी. राज्यात ज्या नेत्यांची तिकीट कापली गेली ती केंद्रीय पातळीवर नाही राज्यपातळीवर ती कापली गेली आहे. माझ्या विरोधात जर दोन उमेदवार असते तर पराभव झाला नसता.आमचं सरकार असूनही धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता म्हणून हवी ती मदत मिळाली. महाराष्ट्रात इतरांच्या विजयाची नवे माझ्या पराभवाची सर्वात जास्त चर्चा झाली

'मी पुन्हा येईन' ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावर बरीच टीका झाली. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी पुन्हा येईन ही घोषणा निवडणूक प्रचाराचा एक भाग होती. त्यात गर्व कुठेही डोकावलेला आम्ही तरी पाहिला नाही. आता लोक याची  खिल्ली उडवत आहे.  पराभव झाला की अशा घोषणांची खिल्ली उडतेच'.