मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी 8.30 वाजल्यापासून राहुल गांधी यांची ही पदयात्रा गुरुद्वारापासून सुरू झाली. आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान आदी नेते पायी चालत आहेत. सकाळी साडेऊन नंतर बाळासाहेब थोरात यात्रेत सहभागी झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसह राज्यभरातील हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले आहेत. याबरोबरच भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाली आहे.
कुणाल राऊत यांना पदयात्रा मार्गातून बाहेर काढले
भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर आज सकाळी साडे नऊच्या आसपास युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी पदयात्रा मार्गातून बाहेर काढले. पोलिस आणि कुणाल राऊत यांची यावेळी बाचाबाची झाली. पदयात्रा वनाळी गुरुद्वाऱ्याच्या पुढे जात असताना हा प्रकार घडला.
राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू
भारत जोडो यात्रा दरम्यान आज नांदेड जिल्ह्यातील अटकलीमध्ये काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 'भारत जोडो यात्रे'चे झेंडा तुकडीचे संचालन केले. त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी त्यांचे दुःखद निधन झाले. कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली.
कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाली हाती घेऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात नांदेडमधील देगलूर येथे दाखल झाली. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
गॅस दर वाढ, पेट्रोल दरवाढीविरोधातील बॅनर
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रेतील उत्साह कायम होता. गॅस दर वाढ, पेट्रोलची दरवाढ विरोधातील बॅनर घेऊन काँग्रेस नेते विश्वजीत कदम यात्रेत सहभागी झाले. भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल गांधींच्या स्वागतासाठी पारंपरिक पोशाखात मुलींची हजेरीपारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुली तुळशीचं झाड त्याचबरोबर श्रीफळ घेऊन राहुल गांधी यांचे स्वागत केले.
शंकर नगर येथे मुक्काम
भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. सोमवारी रात्री देगलूर येथे राहुल गांधीनी मुक्काम केल्यानंतर आज ते शंकर नगर येथे पोचतील. तिथेच त्यांचा आणि यात्रेकरूंचा मुक्काम असणार आहे.