Prashna Maharashtrache LIVE : प्रश्न महाराष्ट्राचे : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी खास बातचित

Prashna Maharashtrache LIVE Updates : एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. यात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधला आहे.

सतिश केंगार Last Updated: 27 May 2022 05:52 PM
वाळू माफियांच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले...

वाळू माफियांच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ''विकासाच्या कामाला, बांधकामाला खूप गती आली आहे. त्याचा पुरवठा हा वाळू असून हा त्याचा अविभाज्य भाग झाला आहे. यात दगडांपासून कुत्रिम वाळू देखील तयार केली जाते. मात्र आज तरी वाळू वापरली जात आहे. त्याची मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. दुसरी अडचण म्हणजे, यात विशेष विभाग येतो पर्यावरण विभाग. यात वाळू प्रश्नावरून अनेक पर्यावरणवादी न्यायालयात जात असतात. ज्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्हाला काम करावं लागतं.'' ते म्हणाले, ''यातच वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही कडक कायदे केले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येते.'' 

शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक: थोरात

थोरात म्हणाले की, रोजगार कशा पद्धतीने निर्माण होणार, हा प्रश्न आहे. शेतीची मर्यादा आहे. शेतीच्या वाटण्यात होतात. अनेक प्रश्न शेतीशी संबंधित आहे. शेतीवरील भार कमी करणं आवश्यक आहे. शहरात ही किती रोजगार निर्माण होतात... म्हणून या सर्वात नगर जिल्ह्यातच म्हटलं तर दुधाच्या व्यवसायातून गरीब माणूस सुद्धा दोन-तीन गायी पाळतो. दूध काढतो, ते विकतो यातून रोजगार निर्माण होतो. आपल्याला अशा काही गोष्टी कराव्या लागतील ज्यातून रोजगार तयार होईल आणि तरुणांना काम मिळेल. यातून अर्थव्यवस्था देखील सुधारेल. नीती आयोग देखील यावर विचार करत असेल. मात्र यावर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे. 

बेरोजगार तरुणांचा प्रश्न सर्वात मोठा: थोरात

राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले आहेत की, बेरोजगारीचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही. हा संपूर्ण देशापुढील प्रश्न आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहिली तर यातील मोठा घटक हा तरुण आहे. तरुणांचा वाटा मोठा आहे. गावागावात अशी खूप मोठी संख्या आहे, ज्यांच्या हाताला काम नाही. त्यांना काम देण्याची आवश्यकता आहे. देशाच्या विकासाचा विचार करताना बेरोजगार तरुणाचा विषय हा प्रामुख्याने घेतला पाहिजे.  

दोन वर्षात महसूल गोळा करण्यात अडचणी आल्या: थोरात

राज्यात जो महसूल एकत्र होत असतो, त्यात मर्यादित वाटा (महसूल विभागाचा) आमचा आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क यातून खरा महसूल गोळा होत असतो. या दोन वर्षात आम्हाला त्यात अडचणी आल्या. कारण पूर्णपणे मुद्रांक शुल्क कार्यालय बंद होते. हे असं असलं तरी आम्ही त्यात काही निर्णय घेतले. ज्यात आम्ही पहिल्या टप्प्यात घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. दुसऱ्या टप्प्यात दोन टक्के सवलत दिली. यात आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे कोरोना काळात जितका महसूल गोळा झाला नाही, तितका आम्हाला या काळात मिळाला. यामुळे अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

कोरोनाच्या संकट काळात सर्व विभानांनी चांगलं काम केलं : थोरात

दोन वर्षाच्या कोरोना काळात सर्व विभानांनी चांगलं काम केलं. यात महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी होती, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

कुठे पाहाल कार्यक्रम?




'प्रश्न महाराष्ट्राचे' हा विशेष कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.







 

पार्श्वभूमी

पार्श्वभूमी



Prashna Maharashtrache LIVE Updates : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.


अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.


राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग


या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.


दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील. 


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री  बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.