01 एप्रिल 2025 नंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट म्हणजेच HSPR नंबरप्लेट बंधनकारक करण्यात आलंय.. यासाठी रजिस्टेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय समजून घेऊयात..
1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता 31 मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. . त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.
01. त्यासाठी तुम्हाला गुगलवर HSRP Number Plate Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा..
02. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल...
03. आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे.
04. त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं... त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक ..इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक.. आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे.. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल..त्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे पेमेंट करावं लागेलं.
दुचाकी, ट्रॅक्टर 450तीनचाकी 500चारचाकी, अन्य वाहने 745
ही प्रोसेस करून तुम्ही ऑनलाईन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला Apply करू शकता..