Majha Katta : सध्याच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनात नकारत्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांमध्ये वाढलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांना जीवनात त्रास होतोच पण त्यांच्या सोबतच्यांनाही त्रासाला सामोरं जावं लागतं. दरम्यान या अशा नकारत्मकतेमध्ये सकरात्मकता (Positivity) मिळवण्यासाठी काय कराल याच उत्तर मैत्री बोध परिवाराचे अध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्री यांनी सांगितले आहे. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात त्यांनी अगदी साध्या-सरळ मार्गाने सकारत्मकता मिळवण्यासह आयुष्य साध्या पण आनंदी पद्धतीने जगण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले.
आजच्या अस्थिर युगात शांतता, प्रेम, निःस्वार्थ सेवेचा भाव कसा वाढीस लावता येईल, तसंच स्वत:मध्ये सकारात्मकता कशी वाढवाल याबाबत गुरु मैत्रेय दादाश्री यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला तो म्हणजे ''आपले नीत्यकर्म व्यवस्थित करा हेच पुरेसं आहे.'' पुढे बोलताना दादाश्री म्हणाले, ''अनेकांना सकारात्मकता मिळवण्यासाठी विविध गोष्टी कराव्या लागतात. यात पुजा, होम तसंच श्लोकपठण अशा काही गोष्टी कराव्या लागतात. पण माझ्या गुरुंकडून मी अगदी साध्या पद्धतीने सकरात्मकता आणायला शिकलो. यामध्ये आपलं काम व्यवस्थित करणं, ते करताना आचरण आणि विचार शुद्ध असणं येवढंच महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.''
दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी स्वत:ला पाहा
गुरु मैत्रेय दादाश्री यांनी पुढे बोलताना आणखी महत्त्वाचे सल्ले दिले. यावेळी काहीजण आधी होमहवन, पुजा करतात. पण त्यानंतर पाप करतात त्यामुळे सर्व पुण्याचं रुपांतर पापामध्ये होते. असे न करता जे ही काम आहे ते शुद्ध विचाराणे करणे गरजेचे आहे, असे दादाश्री म्हणाले. तसंच व्यस्त वेळापत्रकातून स्वत:कडे पाहायला वेळ काढा. दुसऱ्याच्या चूका काढत बसण्यापेक्षा स्वत:कडेही पाहा असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा-
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर
- Majha Katta: मराठीवर प्रेम करायला शिकलो, गिरणगावातील वातावरणाचा संगीतावर प्रभाव; संगीतकार आनंदजी यांनी जागवल्या आठवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha