नागपूर : नागपूरपासून दोन तासांवर असलेल्या चंद्रपूरच्या नागभीडच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा आढळल्या आहेत. संस्कृतीचा वारसा सांगणारे 48 एकाश्म स्मारकं सापडली आहेत. या स्मारकातून प्राचीन तेजस्वी इतिहास पुढे येण्याची शक्यता आहे.
नागपूरपासून पावणेदोन तासांवर नागभीडच्या जंगलाचा परिसर आहे. या जंगलात ओबडधोबड असे एकना-दोन तब्बल 48 एकाश्म स्मारकं असल्याचा दावा इतिहास अभ्यासक अमित भगत यांनी केला आहे. तब्बल हजार वर्षापूर्वी स्मारकासाठी मेगालिथिक कल्चर अर्थात मोठ्ठे दगड वापरण्याची पद्धत होती. त्यातीलच ही एकाश्म स्मारकं असल्याचं भगत यांचं म्हणणं आहे.
अमित भगत गेली अनेक वर्ष या परिसराचा अभ्यास करत आहेत. या परिसरात उत्खनन केलं, तर मोठा ऐतिहासिक वारसा नजरेस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अमित यांच्या प्रयत्नांमुळे पुरातत्व खात्यानं एकाश्म संस्कृतीचा अभ्यास गांभीर्यानं घेतला आहे. सध्या या परिसराच्या सर्वेक्षणाची तयारीही सुरु झाली आहे.
भारतीय संस्कृती, इतिहास कायम जगभऱातील अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. अनेकदा वातावरणातील बदल, संकटांमुळे अशा समृद्ध संस्कृती नजरेआड होते. त्यामुळे नागभीड जंगलातल्या दफनभूमीचं उत्खनन झालं तर ऐतिहासिक आश्चर्यांची खाण आपल्यासमोर येईल.
दरम्यान, यापूर्वी विदर्भात समुद्र असल्याचाही दावा करण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील कोंडीच्या जंगलात समुद्री जीवाश्म आढळून आले आहेत. त्यामुळे निसर्ग आणि इतिहासाचा ठेवा विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आढळून येत आहे.
नागपूरजवळील नागभीडच्या जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Apr 2018 01:46 PM (IST)
नागपूरपासून दोन तासांवर असलेल्या चंद्रपूरच्या नागभीडच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा आढळल्या आहेत. संस्कृतीचा वारसा सांगणारे 48 एकाश्म स्मारकं सापडली आहेत. या स्मारकातून प्राचीन तेजस्वी इतिहास पुढे येण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -