Hingoli News: राज्यात नव्याने मंजुरी मिळालेल्या नऊ पैकी आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (government medical College) सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नकार दिला आहे.  महाविद्यालयात रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागांचे कारण देत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.


राज्यात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता


राज्य शासनाने नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून यामध्ये हिंगोलीसह मुंबई, अंबरनाथ, नाशिक, अमरावती, गडचिरोली, भंडारा, वाशिम, जालना येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश क्षमता आहे. या नऊ महाविद्यालयामध्ये यावर्षी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 900 विद्यार्थ्यांची सोय होणार होती. परंतु, या नव्याने सुरू केलेल्या  महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची नियुक्ती नसल्याने यावर्षी हे कॉलेज सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नकार दिला आहे.


निर्णयाविरोाात केले जाणार अपील


हिंगोलीत रिक्त जागांचे कारण देत नवीन शासकीय विद्यकीय महाविद्यायाला परवानगी नाकारल्याच्या निर्णयाच्या विरोधात आता अपील केले जाणार आहे. पुढील 45 दिवसांमध्ये निकाल येणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी दिली आहे.


देशात २०२४ साठी ११३  पदवीपूर्व वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता


राष्ट्रीय वेद्यकीय आयोगाने(NMC) २०२४-२५ साठी देशभरात  ११३ नवीन पदवीपूर्व वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. एनएमसीने ६ जुलै रोजी अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या सार्वजनिक नोटीशीमध्ये हा निर्णय जाहीर केला आहे..


केंद्र शासनाने देशात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याचे धोरण आखले असून २०२४ – २५ या सत्रात ही सुरू होणार आहे. तसेच यापूर्वी वैद्यक आयोगाने पदव्युत्तर शाखेतील नवीन अभ्यासक्रम तसेच जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे.


हेही वाचा:


​NEET PG 2024 Date: नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून मोठी अपडेट