हिंगोली : तंबाखूची थुंकी अंगावर पडल्याने तरुणाने एकाची हत्याची केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. ज्ञानेश्वर कुंभकर्ण असं या आरोपीचं नाव असून मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याला पुण्यातील येरवडा इथल्या रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचंही पोलिस म्हणाले.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा इथे बसवेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरु होतं. या कामावर सय्यद अफसर सय्यद रसूल आणि ज्ञानेश्वर कुंभकर्ण हे दोघे मजूर काम करत होते. यावेळी सय्यद अफसर तंबाखू खाऊन थुंकला. त्यावेळी थुंकी ज्ञानेश्वर कुंभकर्णच्या अंगावर पडली. या रागात ज्ञानेश्वरने सय्यदच्या डोक्यात फावडा मारला, ज्यात सय्यद अफसर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखलं करण्यात आलं. परंतु नंतर नांदेडला हलवण्यात आलं, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना असते. मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे. या घटनेने हिंगोलीत सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तंबाखूची थुंकी अंगावर पडल्याचा राग, हिंगोलीत तरुणाकडून एकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2019 10:39 AM (IST)
तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना असते. मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे. या घटनेने हिंगोलीत सर्वत्र खळबळ उडाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -