हिंगोली: पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. हिंगोलीतील मोची गल्ली भागात ही घटना घडली.


दरम्यान जखमींना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जुन्या वादातून काल रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.