रवी क्षीरसागर हा केवळ आठवी पास असलेला हा ध्येयवेडा तरुण ड्रायव्हर. कामाच्या शोधात जालना जिल्ह्यातून हिंगोलीत आलेल्या रवीने हिंगोलीत आल्यावर एक अनोखं यंत्र तयार केलं. एका हाताला हे यंत्र घड्याळासारखं बांधून मोबाईलला ब्लूटूथच्या माध्यमातून जोडायचं. फोन आला की कानाला हाताचं कोणतंही बोट लावायचं आणि संभाषण सुरु करायचं.
VIDEO | आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीतून विधानसभा लढवणार?
रवीने यासाठी घड्याळासारखं डिव्हाईस प्राथमिक स्वरुपात बनवलं आहे. ब्लूटूथ किट, ऑडियो बोल्ड, बॅटरी आणि कॉईल या चार वस्तूंचा यासाठी रवीने वापर केला. शरीराच्या नसमधून ऑडिओ लहरी स्पीकर होऊन बोटातून कानापर्यंत पोहचतात, असा दावा रवी क्षीरसागरने केला आहे.
मोबाईल चार्जरने हे यंत्र चार्ज करता येतं. एकदा चार्ज केल्यानंतर दोन तास हे यंत्र काम करतं. हे डिव्हाईस प्राथमिक स्वरुपात आहे. मात्र
कानाला बोट लावून बोलणं खरचं शक्य आहे का? तज्ज्ञ मंडळींनी हे संशोधन बघितलंय का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र भविष्यात कानाला फक्त बोट लावून बोलणं अशक्य नाही, हे या संशोधनातून समोर आलं आहे.