वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. सोमवारी (10 फेब्रुवारी) अत्यंत शोकाकुल वातावरणात दारोडा गावाने आपल्या लेकीला निरोप दिला. वडिलांनी पीडितेच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

हिंगणघाट घटनाक्रम : 

02 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता – आरोपी विकेश नगराळे यानं गाडीतील 2 ते 3 लीटर्स पेट्रोल काढून जाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती.

03 फेब्रुवारी सकाळी 7.15 वाजता– पिडीत मुलगी कॉलेजमधे जात असताना आरोपी विकेश नगराळे यानं हिंगणघाटमधे नंदोरी चौकात पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यामधे मुलगी 40 टक्के जळाली.

  • पहाटे घरातून निघताना अतिरिक्त कपडे घेऊन तो गेला होता.

  • तरुणीला जाळण्याचा उद्देशानं गाडीतून पेट्रोल 2 - 3 दिवसआधीच काढून ठेवल्याची माहिती आहे. बॉटलमधून पिडीतेच्या अंगावर पेट्रोल टाकताना ते इकडे तिकडे पडून वाया जाऊ नये, संपूर्ण पेट्रोल अंगावर पडावे म्हणून प्लास्टिक एक बॉटलला आधीच वरून कटर ने कापून त्याचा मग सारखा तयार केला होता.

  • पीडितेवर पेट्रोल टाकून तिला जाळल्यानंतर आरोपी रिमडोह शिवार, राधानगरी परिसरात गेला. तिथे आपले कपडे बदलले. त्याच्या कपड्यांवर ही पेट्रोलचे शिंतोडे उडले असावे, आणि हे कपडे पुढे पुरावा म्हणून महत्वाचे . कपडे जप्त केले आहे पोलिसांनी जप्त केले आहे. इतर ही काही वस्तू जप्त केले आहे

  • त्यानंतर दुसरे कपडे घालून आरोपी आजंता या गावात जवळच्या नातेवाईकांकडे गेला.

  • त्यांच्याकडे काही वेळ बसला. तिथून एका दुसऱ्या फोनने आपल्या एका जवळच्या मित्राला फोन करून त्याने काय केले आहे हे सांगितले आणि पुढे टाकळघाट मार्गे नागपूरला जाण्यासाठी 9:30 च्या सुमारास आजंती मधून निघाला.

  • टाकळघाट येथे मात्र तो विक्तूबाबा मंदिराजवळ अकरा ते साडे अकरा दरम्यान तो नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला वर्धा पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.


03 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता – प्रथमोपचारानंतर पीडितेला नागपुरच्या ऑरेंज सिटी रूग्णालयात दाखल केलं.

03 फेब्रुवारी सका 9.30 वाजता – एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर सगळीकडे वणव्यासारखी बातमी पसरली आणि त्यानंतर समाजातून सर्वत्र निषेध आणि चीड व्यक्त करायला सुरूवात केली.

03 फेब्रुवारी सकाळी 11.45 वाजता – आरोपी विकेश नगराळे याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून ताब्यात घेतलं.

03 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता – अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्याअंतर्गत सदर घटनेवरून प्रश्न विचारला.

03 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता – हिंगणघाटमधे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया शहरात बंद करायला सुरूवात.

04 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता – ऑरेंज सिटी रूग्णालयाचं मेडिकल बुलेटिन – पीडितेची प्रकृती चिंताजनक..कृत्रिम श्वासोच्छवास सुरू.

04 फेब्रुवारी दुपारी 4.30 वाजता – हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून कऱणार असल्याची

04 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता – गृहमंत्री अनिल देशमुख हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित मुलीच्या उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांसह नागपूरकडे रवाना. पीडितेच्या परिवाराची भेट घेतली.

05 फेब्रुवारी सकाळी 9.30 वाजता – मेडिकल बुलेटिनमधे माहिती..मुलीनं हात हलवून आईशी इशाऱ्याद्वारे बातचित केली..प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक.

05 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता – राज्यात ठिकठिकाणी मुलीच्या तब्येतीसाठी देवीदेवतांच्या पूजाअर्चना सुरू.

05 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता – नागपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी हिंगणघाट पोलिस स्टेशनला भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

05 फेब्रुवारी दुपारी 1.45 वाजता – घटनेचा तपास पुलगाव एसडीपीओ तृप्ती जाधव या महिला अधिकाऱ्याकडे सोपवल्याची वर्धा पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांची माहिती.

06 फेब्रुवारी – हिंगणघाटमधील घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंदचं आवाहन.

06 फेब्रुवारी सकाळी 11.30 वाजता – पीडितेचं मेडिकल बुलेटिन – प्रकृती स्थिर मात्र शरीरात जंतुसंसर्ग पसरायला सुरूवात झाल्यानं डॉक्टर अधिक सतर्क.

06 फेब्रुवारी दुपा 2.00 वाजता– हिंगणघाट पीडितेची भेट घ्यायला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल.

06 फेब्रुवारी सायंकाळी 7.00 वाजता – हिंगणघाट पिडीतेची स्थिती पाहण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑरेंज सिटी रुग्णालयात भेट घेतली.

07 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता– पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमधे माहिती..आतापर्यंत तीन ऑपरेशन्स केले असले तरी परिस्थिती गंभीरच.

08 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता – हिंगणघाट प्रकरणातल्या आरोपीला पहाटेच पोलिसांनी न्यायालयात हजर केलं.

08 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता – मेडिकल बुलेटिन अपडेट – पीडितेला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. परिस्थिती गंभीर.

09 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता – पीडितेचं मेडिकल बुलेटिन – पीडितेचं ऑपरेशन करून तिच्या शरीरातील अनावश्यक घाण स्वच्छ केली गेली..जळालेली स्किन काढली गेली.

10 फेब्रुवारी पहाटे 4.30 वाजता - डॉक्टरांनी आई वडिलांचे मामाचे समुपदेशन केलं.

10 फेब्रुवारी सकाळी 6.55 वाजता – पीडितेचा नागपुरच्या ऑरेंजसिटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू..तीन वेळा हृदयघात होऊन हृदय बंद पडलं.

10 फेब्रुवारी सकाळी 9.30 वाजता – वर्ध्याचे पालकमंत्री सुनिल केदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरच्या शासकीय रूग्णालयात पोचले..तिच्या परिवाराल समजावल्यानंतर त्यांनी पार्थिव ताब्यात घेतले.

10 फेब्रुवारी सकाळी 10.30 वाजता – पीडितेचं पार्थिव तिच्या वर्धा जिल्ह्यातील गावी रवाना.

10 फेब्रुवारी दुपारी 12.30 वाजता – हिंगणघाट तालुक्यातून हायवेवरून पीडितेचं पार्थिव तिच्या गावी रवाना.

10 फेब्रुवारी दुपारी 1.00 वाजता – दारोडा गावी हायवेवर पीडितेचं पार्थिव पोहचत असताना गावकऱ्यांनी एम्ब्युलन्स अडवण्याचा प्रयत्न केला.. एम्ब्युलन्सवर तूफान दगडफेक केली.

10 फेब्रुवारी दुपारी 1.25 वाजता – पीडितेच्या दारोडा गावातील घरी तिचं पार्थिव पोचलं. घराबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा.

10 फेब्रुवारी दुपारी 2.00 वाजता– वर्ध्याचे खा.रामदास तडस पीडितेच्या घरी दाखल.

Hinganghat Teacher Death | हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या डॉक्टरांची प्रतिक्रिया | ABP Majha