मुंबई : राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने 13 हजार 348 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण 3 लाख 51 हजार 710 रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज 12 हजार 248 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 45 हजार 558 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक 78 हजार 70 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले 12,248 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 390 मृत्यू यांचा तपशील
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई मनपा - 1066 (48), ठाणे- 247 (7), ठाणे मनपा-214 (3), नवी मुंबई मनपा- 348 (9), कल्याण डोंबिवली मनपा- 319 (13), उल्हासनगर मनपा- 24 (1), भिवंडी निजामपूर मनपा-24 (2), मीरा भाईंदर मनपा- 117 (12), पालघर- 227 (5), वसई-विरार मनपा- 227 (5), रायगड-239 (5), पनवेल मनपा-206 (2), नाशिक-136 (3), नाशिक मनपा-807 (9), मालेगाव मनपा-29 (2), अहमदनगर- 399 (1), अहमदनगर मनपा- 199 (3), धुळे- 95, धुळे मनपा-34 (1), जळगाव-273 (24), जळगाव मनपा- 57 (4), नंदूरबार-26, पुणे- 517 (17), पुणे मनपा- 1433 (58), पिंपरी चिंचवड मनपा-1066 (20), सोलापूर-327 (7), सोलापूर मनपा-80 (3), सातारा-257 (8), कोल्हापूर-307 (8), कोल्हापूर मनपा-137 (5), सांगली-69 (1), सांगली मिरज कुपवाड मनपा-240 (6), सिंधुदूर्ग-27 (2), रत्नागिरी-106 (2), औरंगाबाद-165 (7), औरंगाबाद मनपा-115 (2), जालना-110 (1), हिंगोली-31 (2), परभणी-21 (4), परभणी मनपा-53 (3), लातूर-178 (8), लातूर मनपा-101 (4), उस्मानाबाद-161 (1), बीड-235 (1), नांदेड-141 (3), नांदेड मनपा-1 (2), अकोला-42, अकोला मनपा-26, अमरावती-14, अमरावती मनपा-54, यवतमाळ-88 (10), बुलढाणा-86 (3), वाशिम-42, नागपूर-116 (3), नागपूर मनपा-488 (37), वर्धा-23 (1), भंडारा-2, गोंदिया-28 (1), चंद्रपूर-18, चंद्रपूर मनपा-13, गडचिरोली-5 (1), इतर राज्य 23.

Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आज 12,822 रुग्णांची नोंद

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 25 हजार 090 नमुन्यांपैकी 5 लाख 15 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 588 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 857 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 390 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 390 मृत्यूंपैकी 260 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 76 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 54 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 54 मृत्यू ठाणे जिल्हा – 25, पुणे जिल्हा 15, जळगाव 4, पालघर 3, बुलढाणा – 2, अहमदनगर -1, लातूर -1, मुंबई -1, नागपुर 1 आणि नाशिक -1 असे आहेत.

Mumbra Corona Free| मुंब्र्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल,31जुलैपासून एक आकडी संख्येत नवे रुग्ण