मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 32 वर पोहचला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेतील 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. त्यामुळे आता राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण झाल्यानं देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचं राज्य महाराष्ट्र ठरतंय. कालच एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येतं 12 ने भर पडली आणि आता आज पुन्हा एक कोरोनाग्रस्त वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान राज्य सरकार आणि प्रशासनासमोर उभं ठाकलंय.
मुंबईत जमावबंदी लागू
15 मार्च पासून सगळ्या टूर बंद करण्यात आल्या आहे. 31 मार्च पर्यंत बंद टूर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन हा निर्णय घेतला आहे. मुंबई दर्शन सारख्या टूर देखील बंद करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे देशात दोन बळी
भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
शहरी भागातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद
राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असं स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे. राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं.
अमेरिकेत कोरोनाचे 50 बळी
अमेरिकेत कोरोनाचे 50 बळी गेले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. तसंच कोरोना विषाणूची मोफत चाचणी करण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले आहेत.
Coronavirus | कोरोनाला घाबरत नाही, खबरदारी घेतो; मुंबईकरांची प्रतिक्रिया
संबंधित बातम्या :
इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
#Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी