उच्च न्यायालयाने रमेश कदमांचा जामीन अर्ज फेटाळला
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 03 Dec 2018 08:15 PM (IST)
कारागृहातील असभ्य वर्तन आणि साक्षीदारांचं रक्षण या मुद्यांवर रमेश कदमांचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना जामीन देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. कारागृहातील असभ्य वर्तन आणि साक्षीदारांचं रक्षण या मुद्यांवर रमेश कदमांचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्याप्रकरणी असलेले रमेश कदमांची आतापर्यंत 250 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रमेश कदम हेराष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तुरुंगात असूनही रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, शिवीगाळ करणं या कलमांखाली रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.