सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नारायण राणेंची कणकवलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे दुरावलेले संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहे. त्यामुळे राणे भाजपपासून दुर जातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राणे आणि पवारांची भेट महत्वपूर्ण असणार आहे.
गेल्या निवडणूकीत काँग्रेसकडे असलेला सिंधुदुर्ग मतदारसंघ यावेळी राष्ट्रवादीने मागितला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस राणेंना उतरवणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. पवार आणि राणेंच्या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदसत्यात आहे.
या भेटीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार आणि नारायण राणे यांची कणकवली येथील भेट ही वैयक्तिक स्वरूपाची होती. नारायण राणे हे आमच्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे वेगळे स्थान ठेवले आहेत.
शरद पवार आणि नारायण राणेंची कणकवलीत भेट, राजकीय चर्चांना उधाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2018 05:55 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे दुरावलेले संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहे. त्यामुळे राणे भाजपपासून दुर जातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राणे आणि पवारांची भेट महत्वपूर्ण असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -