Continues below advertisement

HidayatPatelMurderCase:वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेटसमोर आलीआहे. फरार आरोपी राजू बोचे याला साडे तीन महिन्यानंतरनागपुरातूननाट्यमारित्या अटक केली आहे. हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनीच फरारआरोपीला पकडले आहे. राजू बोचे हा अकोल्यातील काँग्रेसचा प्रभावशाली नेता असून तो जिल्हा परिषदेचे माजी सभापती होता.

हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारीला झाला होता जीवघेणा हल्ला

हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावातील मशिदीत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 7 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा, काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष संजय बोडखे आणि राजू बोचे यांच्यावरअकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार होते.

Continues below advertisement

तब्बल साडेतीन महिन्यांनंतर या प्रकरणातील एका फरारआरोपीला पकडण्यात यश

दरम्यान, आजनागपुरातील रवी भवन या शासकीय सर्किट हाऊस परिसरात हिदायत पटेल यांचे पुतणेफतेह पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजू बोचे याला पकडल्याची माहिती आहे. फरार राजू बोचे पकडला गेल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोचे आणि त्याला पकडणाऱ्याफतेह पटेल व त्यांच्या सहकार्यात चांगलीच झटापट ही झाली. त्यानंतर नागपूरपोलिसांनी बोचे याला ताब्यात घेत अकोटपोलिसांच्या स्वाधीन केले. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर या प्रकरणातील एका फरारआरोपीला पकडण्यात यश आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा आणि काँग्रेस नेते संजय बोडखे अद्याप फरार आहेत.

गुरुवारी दुपारी आरोपी रवीभवन परिसरात जेवणासाठी गेला होता. अकोट तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्ते त्यावेळी त्याच परिसरात होते. त्यांनी राजूला ओळखले व त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यात झटापट झाली व राजूनेदेखील त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्याला चोप दिला व पोलिसांना फोन केला. सदर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तेथे पोहोचले व राजूला ताब्यात घेतले. पोलिसांनी अकोट ग्रामीणच्या पथकाला या प्रकाराची माहिती दिली. तेथील पथक सायंकाळी नागपुरात पोहोचले व त्याला त्यांच्या हवाली करण्यात आले.

कोण होते हिदायत पटेल?

हिदायत पटेल प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोल्यातील काँग्रेसचा प्रभावी मुस्लिम चेहरा होते.

अकोला जिल्हा काँग्रेसचे ते 8 वर्ष जिल्हाध्यक्षराहिले..

2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून उमेदवारी मिळाली होती..

2014 मध्ये दुसऱ्या तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहून पराभूत झाले होते..

हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते ही होते.. 25 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते.. अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आणि अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि संचालक राहिले होते..