संगमनेर : 88व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत दोन्ही नातवांनी आपल्या आजी-आजोबा यांना अनोखी सफर घडवली आहे. पुणे ते चिंचोली या त्यांच्या मूळ गावी चक्क हेलिकॉप्टरमधून आणून जंगी सोहळा पार पाडला आहे. यापूर्वी वधुसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, आजी-आजोबांसाठी हेलिकॉप्टर सफर घडवल्याची ही कदिचित पहिलीच घटना असेल.


संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव गावचे गोडगे कुटुंबीय. या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेले देवराम व चहाबाई हे दाम्पत्य. त्यांचा 88वा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे नातू अविनाश व नंदकुमार यांनी अविसमरणीय करण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांना थेट पुण्याहून हेलिकॉप्टरमधून गावी आणत वाजत गाजत मिरवणूक काढून सोहळा पार पाडला.



दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत
आयुष्यात प्रथमच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचा आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावात हेलिकॉप्टर येणार असं समजल्याने अनेक आबाल वृद्धांनी देखील गर्दी केली होती.


आपल्या वधुला नेण्यासाठी चक्क हेलीकॉप्टरचं घेऊन आला


दरम्यान यावेळी गावातून मिरवणूक काढल्यानंतर सोहळ्यानिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन ठेवण्यात आल्यानं ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सध्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आल्यामुळे भजन संपताच कीर्तन सुरू करताना मात्र इंदोरीकर महाराजांनी मीडियासह आयोजकांनी लावलेले कॅमेरे बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यांनतरचं कीर्तनाला सुरुवात केली.