मुंबई: गणेशोत्सवकाळात (Ganesh Chaturthi) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai- Goa Highway) अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.16 टन पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान NH 66 वरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे.गणेशोत्सव सणाला मुंबईकर चाकरमानी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रह (परिवहन ) विभागाने निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवकाळात अत्यावश्यक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट राहणार आहे. यामध्ये दूध,पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना मुभा असणार आहे.
गणेशोत्सव काळात कोणत्या दिवशी कशी आणि किती दिवस बंदी राहणार ते पाहूया?
- 5 ते 8 सप्टेंबर रात्री 12 पासून रात्री 11 पर्यंत राहणार बंदी
- 11 ते 13 सप्टेंबर च्या कालावधीत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बंदी
- 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार बंदी
कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना
मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई गोवा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग खडबडून जाग आलीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर दिवस रात्र कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी वेगानं काम सुरू आहे.नागोठणे ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यासाठी दिवस रात्र काम सुरू आहे. मे चेतक कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होताच इतर कंत्राटदारांनी वेगानं काम सुरू केलंय. गणेशोत्सव सणापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
गोवा हायवेचे 2007 पासून चौपदरीकरणाचं काम सुरू
गोवा हायवेचे 2007 पासून चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. आज 17 वर्षे लोटली तरी खड्ड्यातच आहे. आतापर्यंत मंत्री रवींद्र चव्हाणांनी 10 ते 12 वेळा मुंबई- गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. प्रत्येक दौऱ्यावेळी कोकणवासीयांचा आशा पल्लवीत करणारी आश्वासनं दिली जात आहेत. मात्र गणपती तोंडावर येताच त्या सगळ्या आशा हायवेवरच्या खड्ड्यात चिरडल्या जातात. गोवा हायवेसाठी लागलेल्या आजवरच्या कालावधीत तीन बुर्ज खलिफा उभारून झाले असते.गणेशोत्सव तोंडावर येताच कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम गेल्या 17 वर्षांतल्या प्रत्येक सरकारनं केलंय. यावर गणपती बाप्पासह संपूर्ण कोकणाचं एकमत झाले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; इंजिनिअरला अटक