Sangli Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दुसरीकडं या पावसाचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी भागात रात्री गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. यामुळं छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने फुटलेल्या घडांची घडकुज होण्याची भीती आहे. 


सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावलेत. जत तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळं फुटलेल्या घडांची घडकुज होण्याची भीती आहे. परतीच्या पावसाने अन्य पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष बागांना देखील या पावसाचा फटका बसल्यानं हा हंगाम वाया जाण्याची भीती आहे.




अन्य पिकांचे देखील मोठं नुकसान


सध्या सोयाबीन पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढून शेतात ठेवलं आहे. अशा स्थितीत जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं सोयाबीनचा मोठं नुकसान झालं आहे. तसेच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्यानं हातात आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 


ऊसाचा गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता


सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. मात्र, सध्या राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. या पावसामुळं ऊसाचं पिक आडवं झालं आहे. तसेच शेतात पाणी साचून राहिलं आहे. त्यामुळं यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील वर्षाचा गळीत हंगाम लांबला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. 


मराठवाडा आणि विदर्भात या पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान  


सध्या राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात या पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची हाती आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. या नैराश्यतून काही ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊस उचलताना दिसत आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar Rain : नंदूरबारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांना मोठा फटका, 2 ते 3 कोटींच्या नुकसानीचा अंदाज