Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


सध्या नवी मुंबईसह पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कुडुस भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.


पिकांना जीवदान


या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. 


आजपासून पावसाचा जोर वाढणार


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांनी जीवदान मिळालं आहे. 


आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस


जूनपासून आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी (Raiver) आणि धरणांच्या (Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा आहे. यावर्षी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा काही ठिकाणी फटका देखील बसला आहे. मात्र, आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील  लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षी याच काळात पाणी प्रकल्पाचा पाणी साठा हा 67 टक्क्यांवर होता. त्यामानानं यावर्षी पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे.