मुंबई : कोकण आणि विदर्भानंतर मराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 10 जुलैला पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

येत्या 10 जुलै रोजी मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असून तिकडे मराठवाड्यातही लातूर, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, नांदेडमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

तसंच 8 जुलैला दक्षिण महाराष्ट्रातील सातारा  आणि कोल्हापूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तर 9 जुलै रोजीही सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.