नाशिक : नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.

 

पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी


 

मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत. त्यामुळं सध्या गंगापूर  धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.

 

पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी


 

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणाच्या पाणी साठयात मोठी वाढ झालेली आहे व त्यामुळे या धरणांतून आज पहाटे 5 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे :

  • गंगापूर धरणा - 12555 क्यूसेक (गोदावरी नदीत)

  • दारणा धरणा -16800 क्युसेक (दारणा नदीत)

  • पालखेड धरणा - 7376 क्युसेक (कादवा नदीत)

  • कडवा धरणा - 8000 कुसेक्स ( दारणा नदीत)


 

नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नागरिकांना सूचना:

  • नदीकाठावर पूर बघणेसाठी गर्दी करू नका

  • पुराचा धोका लक्षात घेवून त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हा.

  • पुराचा वेग बघतां पुरामध्ये पोहण्याचे दु:साहस करू नका

  • महानगरपालिका आपले सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असून त्याकरीता कार्यरत आहे. कृपया महानगरपालिकेच्या कर्मच्यार्यांना सहकार्य करा



पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी