बीड : गेल्या काही तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. बिंदुसरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.

बीडमधील सरस्वती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील उमरी पारगाव गावाचा संपर्क तुटला आहे. तसंच गेवराई तालुक्यातील चोपड्याची वाडी आणि राजापूर गावातील घरांमध्ये पाणी घुसलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बीड जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या १००.३८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ४0 सर्कलमधे अतिवृष्टी झाली आहे.

बीड जिल्ह्यात २४ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात ८१.२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय आणि मंडलनिहाय पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

बीड तालुका - ७९.६
बीड - १५३, राजुरी - ६३, पेडगाव - १८०, मांजरसुंबा - ६५, चौसाळा - ४५, नेकनूर - ५०, नाळवंडी - ४३, पिपंळनेर - ७३, पाली - ७१, म्हाळस जवळा - ७५, लिंबागणेश - ५७

पाटोदा तालुका - ८०.५
पाटोदा - ७२, थेरला - ९०, अंमळनेर - ११६, दासखेड - ४४

आष्टी तालुका - ३१.०
आष्टी - ६०, कडा - २२, धानगाव - ३९, दो. वडगाव - १२, पिंपळा - १५, टाकळसिंग - ६३, धानोरा - १५

गेवराई तालुका - ७२.४
गेवराई - ८१, धोंडराई - ७५, उमापूर - ८०, चकलांबा - ५१, मादळमोही - ५२, पाचेगाव - ९५, जातेगाव - ११५, तलवाडा - ८४, रेवकी - २७, सिरसदेवी - ६४

शिरुरकासार तालुका - ५९.३
शिरूर - ६१, रायमोह - ५७, तिंतरवणी - ६०

वडवणी तालुका - ११४.०
वडवणी - ११५, कोडगाव बु. - ११३

अंबाजोगाई तालुका - ९०.६
अंबाजोगाई - ७७, घाटनांदूर - ११५, लो. सावरगाव - ७९, बर्दापूर - ११२, पाटोदा - ७०

माजलगाव तालुका - ११४.३
माजलगाव - १२०, गंगामसला - १३५, दिंद्रुड - १४०, नित्रूड - ११५, तालखेड - १०६, कि. आडगाव - ७०

केज तालुका - ९३.०
केज - १०६, विडा - १०३, यु. वडगाव - ८८, ह. पिंपरी - ९८, होळ - ८५, बनसारोळा - ९५, नांदूरघाट - ७६

धारुर तालुका - ८४.३
धारूर - ९५, मोहखेड - ७८, तेलगाव - ८०

परळी वैजनाथ तालुका - ७३.८
परळी - ८८, सिरसाळा - ५०, नागापूर - १००, धर्मापुरी - ७१, पिंपळगाव गाढे - ६०

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १००.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.