मुंबई : महाराष्ट्रातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढला आहे. उष्माघातामुळे राज्यात आतापर्यंत 9 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे.   धुळे जिल्ह्यात 2 आणि अहमदनगर, भंडारा आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एका जणाचा मृत्यू झाला आहे.   काल धुळ्यात कापडणे येथील 29 वर्षीय शेतकरी विकास महादू माळी या शेतकऱ्याचा शेतात कांदे भरत असताना मृत्यू झाला. तर शिरपूरमधील यशवंत चित्रे यांचाही उष्माघाताने मृत्यू झालाय. गेल्या काही महिन्यात राज्यातलं तापमान 45 च्या जवळ पोहोचलं आहे. त्यामुळे उन्हापासून लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.