अश्विनी एकबोटे... वय वर्षे 44.. मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका
शाळिग्राम पाटील... वय वर्षे 57.. मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका
वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांनी गेल्या तीन दिवसात तीन उमद्या माणसांचा जीव घेतला. त्यामुळे कमी वयात गाठणाऱ्या या अनाहूत संकटाची चिंता आता वाढू लागली आहे.
शुभम केचे, नागपुरातला जिंदादिल आरजे... त्याच्या गुडमॉर्निंगनंतरच नागपूरकरांची सकाळ व्हायची... पण तीन दिवसांपूर्वी आपल्या लाईव्ह कार्यक्रमातल्या ब्रेकमध्ये तो वॉशरुमला गेला.. तो परत आलाच नाही
पुण्यातल्या भरत नाट्यगृहात नाट्य त्रिविधाच्या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे नेहमीप्रमाणे प्रयोग करत होत्या... नायक, सिनेमा, मालिका, जाहिराती असं त्यांचं व्यस्त वेळापत्रक होतं.. कदाचित त्याच धावपळीने घात केला असावा अशी शंका तज्ज्ञांना वाटत आहे
शाळीग्राम पाटील यांचं वय पन्नाशी पार केलेलं असलं, तरी तडफदार पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख... नुकतेच रायगडमधून नाशकात बदली होऊन आलेले... त्यांना पोहण्याचाही छंद होता...
नाशिकच्या सावरकर तरण तलावात ते आज सकाळी पोहोण्यासाठी आले. पोहोण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली, पण पाण्यात जाताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच सारं काही संपलं...
उपचार पद्धती पुढारल्यानं माणसाचं सरासरी वय वाढलं असलं, तरी ताण-तणाव, धावपळ आणि फास्ट लाईफस्टाईलमुळे शरिरावरचा ताण वाढू लागला आहे... त्यामुळे या धावपळीतही स्वतःच्या आरोग्यासाठी चार क्षण विश्रांतीचे राखून ठेवण्याची गरज आहे... कारण सर सलामत तो पगडी पचास