Headlines 30 January : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. शिवाय विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल.
शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात लेखी युक्तीवादा
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या लढाई संदर्भात आज महत्त्वाचा दिवस. दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. मागील वेळी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून आज निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जाणार आहेत.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदान
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
बंजारा समाजाचा महाकुंभ मेळावा
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी गावामधील बंजारा समाजाच्या महाकुंभ मेळाव्याचा आज मुख्य दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योग गुरु रामदेव बाबा हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समोरोप
पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर समारोप होणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानातील सभा घेऊन यात्रेचा समारोप होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकवतील. सकाळी 11.30 वाजता सभेला सुरुवात होईल. काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना कार्यक्रमात सहभागी होण्याची निमंत्रण देण्यात आलंय.
मुंबईत चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद
मुंबईत आज चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
मुंबईत सर्व पक्षीय खासदारांची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे.
सचिन वाझेंच्या अर्जावर सुनावणी
माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं जामीनसाह काहा कागदपत्रांची मागणी करत विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
जालन्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
जालन्यात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शहरातील खड्डे युक्त रस्त्याविरोधात अनोख आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत खड्डे मोजण्याची स्पर्धा आयोजित केलीय.
पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादीकडून दिव्यांग्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल आंदोलन होणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांची खडकवासला भागात महासभा
वंचित बहुजन आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत खडकवासला भागात महासभा.
महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त गांधींच्या समाधी राजघाटावर सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन
महात्मा गांधींच्या 75 व्या पुण्यतिथी निमित्त गांधींच्या समाधी राजघाटावर सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलय.