Hasan Mushrif In Kolhapur : के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे. माझा थोरला भाऊ परत मिळाला अशी भावना आहे. के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी केल्याने स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. केपी पाटील यांनी आज पुन्हा एकदा घरवापसी करत शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभा राहणार असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या ठिकाणी एकत्र जमत असेल तिथं महायुती म्हणून आणि जमत नसेल त्याठिकाणी स्वतंत्र लढवली जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

Continues below advertisement

या दोघांनाही मी पक्षाबाहेर सोडणार नाही

मुश्रीफ म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगून त्यांनी आमच्याशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीत 1 लाख मतं मिळाली. त्यांच्यासाठी त्यांनी आजचा निर्णय घेतला. के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघात आम्हाला ताकद मिळाली. के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामुळेच आज हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता आहे. के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यातील वाद मिटवला गेला पाहिजे. मी या दोघांनाही पक्षाबाहेर सोडणार नाही, असा निर्धार यावेळी मुश्रीफ यांनी बोलून दाखवला. 

Continues below advertisement

यावेळी बोलताना त्यांनी कोपरखळीही मारली. ते म्हणाले की, असं बोलल्यावर के पी माझ्यावर खवळून उठेल. के पी पाटील यांचा स्वभाव रोखठोक आहे. हे तोंडावरच काम होणार नाही म्हणून सांगतात. राजकारणात असा स्वभाव चालत नाही.  लोकांना बघूया, काम करूया असं सांगावं लागतं, लोकांच्या कामासाठी प्रयत्न करावे लागतात. भविष्यात आपल्या स्वभावात बदल करतील असा विश्वास व्यक्त करतो, असे ते म्हणाले. 

अजितदादा यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे

केपी पाटील यावेळी म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवताना मोठ्या साहेबांना सांगून इतर पक्षात प्रवेश केला.  अनेकजण आम्हाला सोडून गेले काहीजण अपक्ष लढले, राधानगरी तालुक्याने आम्हाला साथ दिली. आमचं भविष्य काय असं विचारलं जातं, आमचं एकच भविष्य आहे की अजितदादा यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. आता घरवापसी म्हणण्यापेक्षा आम्ही तुमच्याबरोबर होतो. कार्यकर्त्याला जपण्याचं काम हसन मुश्रीफ साहेब करतात. हसन मुश्रीफ यांचा आम्हाला फार मोठा आधार आहे, तुमच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. यापुढील सर्व निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील आणि जिंकल्या जातील. अजितदादा तुम्ही हिमालयासारखं आमच्या पाठीशी उभा राहिलात, दादा तुम्ही चिंता करू नका आम्ही सगळे तुमच्यासोबत संघर्षासाठी तयार आहोत, असे केपी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या