Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकशाहीलाच फाशी दिली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांनी केली आहे. हे अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असा टोला देखील सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला
सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना अधर्मी म्हणले पाहिजे तसेच निंदकाचे घर असावे शेजारी हा संदेश सुद्धा त्यांना मान्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी जल्लाद म्हणलो होतो. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीलाच फाशी देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन कसे झाले असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता त्यांनी राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा शब्दात त्यांनी अधिवेशनाचे वर्णन केले. बिबट्या सारखे विषय या ठिकाणी मांडले गेले आणि महाराष्ट्रचे प्रश्न बाजू गेल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु
सध्या नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत. विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने देखील आल्याचं चित्र पाहायला मिळालं. विरोधकांनी केलेल्या या मागण्या अधिवेशनात पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, गरजेचे असल्याचेही सपकाळ म्हणाले होते.
सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं
सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि अनिवार्य आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळत नाही. राजधर्म न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला अधर्मी म्हटले पाहिजे. कारण संविधानाच्या सर्व तरतूदी त्यांना मान्य नाहीत. एक वर्ष निवडणूका होऊनही सभागृहाला विरोधी पक्षनेता मेळत नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ते आणि काग्रेस पक्षाचे पदाधिकारी याबाबत निर्णय घेतली असे हर्षवर्झन सपकाळम्हणाले.
महत्वाच्या बातम्या: