Happy New Year 2023 Wishes In Marathi: नवीन वर्ष 2023 नवीन आनंदाचं दार ठोठावणार आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. काहीतरी चांगलं आणि नवीन करण्याची जिद्द आहे. नवीन वर्षात लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखतात. गेल्या वर्षभरातील कटू आठवणी विसरून आपण आनंदाच्या सूर्याचे स्वागत करतो. प्रत्येक सणाला एकमेकांना शुभेच्छा देण्याची परंपरा खूप जुनी आहे. या डिजिटल युगात नवीन वर्षाच्या शुभेच्छा एका क्लिकवर जवळच्या आणि प्रियजनांपर्यंत पोहोचवता येतात. नवीन वर्ष 2023 च्या निमित्ताने, तुम्ही या सुंदर शायरीच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
नव्या कल्पनांचे मनोरे रचुया,
नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया,
नवे वर्ष आहे नव्याने आलेले,
नवे रंग उधळून स्वागत करुया.
- अमोल शिंदे
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा.
नव्या या वर्षात ...
संकल्प करुया साधा,
सरळ आणि सोप्पा...
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया
ह्रदयाचा एक छोटासा कप्पा...
“दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्न उरलेली या नव्या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू."
"नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे..
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!