Happy New Year 2023 Live updates: ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत, जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह
Happy New Year 2023 Live updates: सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. नवीन वर्षातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता, बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलें होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
Ahmednagar : नववर्ष स्वागततासाठी देश, विदेशी, राज्यांच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत. शनिवारी लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शिंगणापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आठ दिवसासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद, बर्फीचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आले आहे.
LPG Price: नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात कोणताही बदल झाला आहे. वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर (LPG Price) कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी रिघ लागली आहे. मंदिरात पहाटेपासूनच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक भक्तांच्या गर्दीने वैद्यनाथ मंदिर परिसर फुलला आहे. राज्य आणि परराज्यातून भाविक परळीत दाखल झाले आहेत. एक जानेवारीपासून नववर्षास प्रारंभ झाला आहे. नववर्ष असल्याने वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सहकुटुंब भाविक दर्शनासाठी येत असताना पाहायला मिळत आहेत
नाशिकमध्ये 70 हून अधिक ठिकाणी नाकाबंदी, हजारोंच्या संख्येने पोलीस रस्त्यावर, प्रत्येक वाहनांची केली जातेय तपासणी,रॅश ड्रायव्हिंग, ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या कारवाई केली जात आहे
31 डिसेंबरच्या पार्शवभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ हे स्वतः रस्त्यावर उतरले .आज 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण डोंबिवली शहरात चौकात चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात असता कल्याणचा डीसीबी सचिन गुंजाळ हे प्रत्येक चौकात जाऊन तपासणी कशी सुरू आहे याची स्वतः पाहणी करत आहेत.टाटा नाका येथे स्वतः एका वाहनचालकाला अडवून त्याची ब्रेथ एनालयझरची टेस्ट केली
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आक साई मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. शिवराजसिंग चौहान गेल्या अनेक वर्षांपासून 31 डिसेंबर रोजी साई दर्शनाला हजेरी लावतात.
नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रय़त्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दापोली मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. काही पर्यटकांनी गोव्याला न जाता दापोलीच्या समुद्रकिनाऱ्याला सर्वात जास्त पसंती दिली आहे.
2023 च्या सूर्याला अलविदा करत नववर्षाच्या स्वागतासाठी नांदेड येथील जगप्रसिद्ध श्री हुजूर साहब सचखंड गुरुद्वारा चरणी माथा टेकवण्यासाठी देशविदेशातील शीख भाविक दाखल झाले आहेत. गुरू गोविंदसिंगजी जयंती आणि नव वर्षाचे स्वागत गुरू चरणी आशीर्वाद घेऊन करण्यसाठी महाराष्ट्र ,पंजाब, दिल्ली, हरियाणा,छत्तीसगढसह देशभरातील व देशविदशातील शीख भाविक सचखंड गुरुद्वारा येथे दाखल झाले आहेत. गुरू गोविंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त व नव वर्षा निमित्त नागरकीर्तन मिरवणूक काढत व गुरूबाणी आणि अरदास करत मोठा उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे.
पुण्यात आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राकडून गुडलक चौकात "दारू नको, दूध प्या" असं सांगत अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. नवीन वर्षाच्या उत्साहात लोक वाहवत जातात आणि मद्यपान सेवन करतात, त्याच अवस्थेत गाडी चालवतात, जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे दारू नको दूध प्या सांगत दूध वाटप करण्यात येतंय
सरत्या वर्षातील सुखद आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षात प्रवेश करूया. नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद घेऊन सुखी, समृध्द, सुज्ञ, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्र घडवूया. नव्या २०२३ वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. नवीन वर्ष महाराष्ट्राच्या यशाचं, सर्वांगीण प्रगतीचं वर्ष ठरो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2022 च्या शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी मुंबईचा पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर राज्यांमधून कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर पहिल्यांदा यावर्षी लोक उत्साहाने आणि जल्लोषात नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करत आहेत,,, गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अलिबाग, मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे.
गोव्यात दोन वर्षांनंतर देशभरात निर्बंधमुक्त नवीन वर्षाच्या स्वगतासाठी पार्टीचं आयोजन केलं जात आहे. मोठ्या संख्येत पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत आणि या पर्यटकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे बोट पार्टी. बोट पार्टी पैकी सर्वात मोठी पार्टी होत आहे मजेस्टिक प्राईडची.
New Year Celebrations : ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत, जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईचे वाहतूक पोलीस सज्ज,मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागत आणि साजरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नियम पाडण्याचं आवाहन, वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईमध्ये आज संध्याकाळपासून 100 ठिकाणी नाकाबंदी लावून वाहतूक नियम न पाळणारांवर कारवाई केली जाणार आहे, मुंबई मध्ये 2200 वाहतूक पोलीस मुंबईचा रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात,,, मुखर्जी चौक ते गेट ऑफ इंडिया च्या दिशेने जाणारा एका साईडचा रस्ता वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे, तर दुसरा मरीन ड्राईव्हचा नेताजी सुभाषचंद्र मार्गवरील नरिमन पॉईंट पासून ते प्रिन्सेस ट्रेड फ्लावर उत्तर दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे,,,, वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण मुंबईचा समुद्रकिनाराचा आजूबाजू चा रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे,,,
New Year Goa Celebration: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता गोवा देखील सज्ज झालं आहे. गोव्यात 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आकर्षक रंगरंगोटी, लाइटिंग, पर्यटकांसाठी यावेळी काही खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटकांचा ओघ आणि पसंती पाहता हॉटेल, रेस्टॉरंट आणि कसीनो देखील 31 डिसेंबरच्या रात्री पर्यटकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देताना दिसून येत आहे.
Kokan Fish Price: कोकणात मासे विक्री ला तेजी आली आहे. सुरमई, पापलेट, कोळंबी या माशांचे भाव वधारले आहेत. वेंगुर्ले मध्ये सुरमई, पापलेटचे भाव दुप्पट झाले आहेत तर मालवण मध्ये सरासरी पेक्षा जास्त भाव आहेत. हे मासळीचे दर या आठ दिवसात वधारले आहेत. पर्यटन हंगाम असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होतायेत. यामुळे कोकणात माशांचे दर देखील वधारले आहेत.
Happy New Year: इअर एंडिंगच्या सेलिब्रेशला पर्यटकांची तळकोकणाला पसंती दिली आहे. समुद्र पर्यटनासोबत खाडीतील कांदळवन सफरीला पर्यटक पसंती देत आहेत. शास्वत पर्यटन हे निसर्गाच्या सान्निध्यात राहून पर्यटनाचा आनंद घेता येतो. यासाठी शांत आणि समृद्ध वातावरण असलेल्या तळकोकणाला पर्यटक पसंती देत आहेत.
Kokan News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल होत आहेत.सकाळपासून रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.मुंबईमधून येणारे चाकरमानी कोकण रेल्वे कोकणामध्ये दाखल होत आहेत.रेल्वेमधून चाकरमानी आल्यानंतर आपापल्या गावाकडे जाण्याच्या प्रवासाला लागले आहेत.पारंपारिक सगळे सण आणि उत्सव साजरी करणारा कोकणी माणूस नववर्षाच्या स्वागतासाठी देखील गावी येत आहे.त्यामुळेच रेल्वे स्थानकात प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते आहे
Nashik News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असून दोन तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर भाविकांना देवाचे दर्शन होत आहे. एकीकडे नववर्षाच्या स्वागताचे प्लनिंग केले जात असतांनाच दुसरीकडे देवाच्या दारात भाविकांच्या रांगा लागल्या असून त्रंबकेश्वर नगरी भाविकांनी फुलून गेलीय. मागिल दोन वर्षे कोरोनाच्या भीतीनं घरात बसूनच नववर्षाचे स्वागत करावे लागले, आता पुन्हा कोरना वाढण्याची भीती असल्याने भाविकांचा ओघ वाढला आहे. त्यात शनिवार रविवार असल्यानं गर्दीत अधिकच भर पडली आहे, वाढत्या गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट कडून केले जात असून एका तासात 1 ते दीड हजार भाविक दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत, भाविकांना बाहेर जाण्यासाठी दक्षिण दरवाजा खोलण्यात आलाय
Matheran News: दोन वर्षानंतर कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्याने यंदा न्यू इयर सेलिब्रेशनचा सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळतोय. त्यातच यंदा विकेंड आणि थर्टी फर्स्ट असा योग जुळून आल्यामुळे मुंबईजवळचं पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. 30 आणि 31 डिसेंबर अशा दोन दिवसात माथेरानमध्ये तब्बल 20 हजार पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे माथेरान हे पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय. माथेरानमध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी 250 हॉटेल्स सज्ज असून आज नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
Kokan Celebration: 31 डिसेंबर साजरा करत असताना कोकणातल्या निसर्गाची भुरळ राज्यासह देशातल्या पर्यटकांना पडली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वच पर्यटन स्थळं सध्या पर्यटकांनी फुलून गेली आहेत. गुहागर, दापोली,राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातल्या पर्यटन स्थळांवर गर्दी झाली आहे. रत्नागिरीपासून जवळ असलेल्या आरे वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवरे या ठिकाणी पर्यटक मजा लुटत आहेत. आपल्या कुटुंबासह निसर्गाच्या सानिध्यात 31 डिसेंबर एन्जॉय करण्यासाठी कोकणाला मोठी पसंती दिली आहे. खासगी गाड्या रेल्वे, एसटी बसेस यासह लाखोंच्या संख्येने पर्यटक कोकणात आले आहेत.
New Year Celebration: नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झालेत... चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे... कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.. पोलिसांकडून मद्यपींची ब्रेथ अॅनलायझरनं चाचणी करण्यात येणार आहे... नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय..
Mumbai Local: नववर्षाच्या निमित्तानं चर्चगेट ते विरार या मार्गावर 8 विशेष लोकल सोडणार आहे. मध्य मार्गावर सीएसएमटीवरून रात्री दीड वाजता शेवटची लोकल कल्याणसाठी सुटणार, तर हार्बर मार्गावरही शेवटची लोकल दीड वाजता आहे.
New Year Celebration: नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे... राज्यातील मुख्य पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाली आहेत... तर देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याकडे अनेकांचा कल आहे.. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूरसह अनेक मंदिरांकडे भाविकांना धाव घेतलीये... दरम्यान नववर्षाच्या स्वागताला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झालेत.
Pune News: थर्टी फस्टनिमित्त पुण्यात कॅम्प आणि डेक्कन परिसरात वाहतूकीत बदल करण्यात आला आहे नववर्ष साजरा करण्यासाठी पुणे शहरातील लष्कर (कॅम्प) आणि डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रस्ता आणि जेएम रस्ता भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे. नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Pawna Dam: नववर्षाच्या स्वागतासाठी पवना जलाशयाच्या किनारी पर्यटकांसाठी टेन्ट कॅम्पिंग परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील मुख्य पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाली आहेत... तर देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याकडे अनेकांचा कल आहे.. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूरसह अनेक मंदिरांकडे भाविकांना धाव घेतलीये. दरम्यान नववर्षाच्या स्वागताला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झालेत.
नववर्षाच्या निमित्तानं चर्चगेट ते विरार मार्गावर 8 विशेष लोकल धावणार आहे. मध्य मार्गावर CSMT वरून रात्री दीड वाजता शेवटची लोकल कल्याणसाठी सुटणार आहे तर हार्बर मार्गावरही शेवटची लोकल दीड वाजता धावणार आहे. नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झालेत... चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे... कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.. पोलिसांकडून मद्यपींची ब्रेथ अॅनलायझरनं चाचणी करण्यात येणार आहे... नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय..
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांकडे भाविकांनी धाव घेतली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे.
आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानं यांनी घेतला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठी रोशनाई केल्याचं दिसत आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -