Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..

 Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 07:36 PM
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील मारूती मंदिरात महाआरती 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. यावेळी पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दादरच्या आगरबाजार पुरातन हनुमान मंदिरात मनसेकडून दुपारच्या आरतीचे आयोजन

देशासह राज्यभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. तर दुसरीकडे हनुमान जयंतीच्या दिवशी राजकारण देखील तापलेले पाहायला मिळत आहे. राजकारणात हनुमान चालीसाचा मुद्दा गाजत असतानाच आज शिवसेना आणि मनसेकडून महाआरतीचं आयोजन केले आहे. यासाठी दादरच्या आगरबाजार पुरातन हनुमान मंदिरात दुपारच्या आरतीचे आयोजन मनसेकडून करण्यात आलंय. दरम्यान, राजकीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल होणार असल्यानं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय

मातोश्रीच्या समोर असलेल्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

मातोश्रीच्या समोर असलेल्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण, सध्या शिवसैनिक मोठा संख्येमध्ये एकत्र येऊन आमदार रवी राणांच्या  विरोधात घोषणाबाजी देत आहेत,,,

औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसाचे पठण 

औरंगाबाद  - औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसाचे पठण , शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसाचे वाचन 


घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणसाठी दाखल

अमरावतीच्या खंडेलवालनगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान चालीसा पठण केल्या जाणार आणि स्वतः मंदिरावर भोंगा चढवणार.. तसंच अनेक मंदिरावर भोंगे लावणार..

औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसाचे पठण 

औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसाचे पठण 


शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसाचे वाचन 


घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

केंद्रीय मंत्री भारती पवार सह महिलांनी ओढला हनुमानाचा रथ... संगमनेर शहरातील हनुमान रथोत्सव..

केंद्रीय मंत्री भारती पवार सह महिलांनी ओढला हनुमानाचा रथ... संगमनेर शहरातील हनुमान रथोत्सव..
1929 पासून रथ ओढण्याचा मान महिलांना..
कोरोना निर्बंध हटविल्यानंतर 2 वर्षांनी महिलांचा उत्साह..
पोलिसांचा मानाचा ध्वज आल्यानंतर रथ मिरवणुकीला सुरवात...
भाजप नेत्या चित्रा वाघ या सुद्धा झाल्या सहभागी...
भारती पवार आणि चित्रा वाघ यांनी वाजवला मिरवणुकीत ढोल

राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी पोलीसांकडे मनसेकडून परवानगी मागितली

राज ठाकरेंच्या हस्ते आज संध्याकाळी पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात पूजा करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीसांकडे मनसेकडून परवानगी मागण्यात आलीय. मात्र हनुमान जयंती सर्वत्र साजरी होत असताना त्यासाठी कुठेच परवानगीची गरज नसल्याचं पोलीसांनी म्हटलय.  मनसेकडून देण्यात आलेला परवानगीचा अर्ज विचाराधीन असून त्यावर निर्णय घेण्याची गरज आहे का याचा विचार सुरु असल्याच पुणे पोलिसांनी म्हटलंय.

PM Modi On Hanuman Jayanti : पंतप्रधान मोदी यांच्याकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा...

मनसेकडून पुण्यात मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंना हिंदू जननायक म्हणत होर्डिंग्ज

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात आज संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे आणि हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या या चौकाच्या परिसरात मनसेकडून मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंची हिंदू जननायक या उपाधीसह होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

Nagpur News -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सोनेगाव परिसरात हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सोनेगाव परिसरात हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण केले जात आहे... 


मनसे चे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्ते करत आहेत आरती आणि हनुमान चालीसा पठण...

जगातील सर्वात उंच हनुमानाच्या 105 फूट उंच मूर्तीला सकाळी जलाभिषेक

आज हनुमान जयंती असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र ०६ च्या बाजूला असलेली जगातील सर्वात उंच हनुमानाच्या १०५ फूट उंच मूर्तीला सकाळी जलाभिषेक करण्यात आला  व याठिकाणी आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी  हनुमान जयंती साजरी होत आहे , कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिवसभर हनुमान भक्त निर्बंधामुक्त पूजा अर्चा करणार आहेत.

हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा




हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जात आहे, हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय, रात्रभर होम हवन धार्मिक विधी पार पडले, राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातुन भाविक दाखल होत आहेत, हनुमानाचा जयघोष करत आहेत  




पार्श्वभूमी

Hanuman Jayanti 2022 : यंदा शनिवारी 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या एका दिवसाच्या  पंचांगाला फार महत्व असते. जाणून घेऊया या पंचांगाबाबत 


तिथी : 16 एप्रिल 2022 हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस आहे. हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते.



नक्षत्र: पंचांगानुसार 16 एप्रिल 2022 रोजी हस्त नक्षत्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हस्त नक्षत्र हे 13 वे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि कन्या राशी आहे.


राहू काळ
पंचांगानुसार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9.8 ते 10.44 पर्यंत राहुकाल राहील. राहुकालमध्ये शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.


16 एप्रिल 2022 पंचांग  


विक्रमी संवत: 2079
पौर्णिमा महिना : चैत्र
बाजू : शुक्ल
दिवस: शनिवार
ऋतू : चैत्र
तारीख: पौर्णिमा - 24:26:51 पर्यंत
नक्षत्र: हस्त - 08:40:40 पर्यंत
करण: व्यष्टी - 13:30:30 पर्यंत, बाव - 24:26:51 पर्यंत
योग: हर्षना - 26:44:28 पर्यंत
सूर्योदय: 05:55:17 AM
सूर्यास्त: 18:47:15 PM
चंद्र: कन्या - 20:02:02 पर्यंत
राहुकाल: 09:08: 16 ते 10:44:46 (या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही)
शुभ मुहूर्ताच्या वेळा, अभिजीत मुहूर्त: 11:55:32 ते 12:47:00
दिशा: पूर्व


अशुभ वेळ


दुष्ट मुहूर्त: 05:55:17 ते 06:46:44, 06:46: 44 ते 07:38:12
कुलिक: 06:46:44 ते 07:38: 12 पर्यंत
कंटक: 11:55:32 ते 12:47:00 पर्यंत
कालवेला / अर्ध्यम: 13:38:28 ते 14:29:56 पर्यंत
तास: 15:21:24 ते 16:12:52 पर्यंत
यमगंड: 13:57:46 ते 15:34:16 पर्यंत
गुलिक वेळ: 05:55:17 ते 07:31:46


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  


मत्वाच्या बातम्या


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.