Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..
Hanuman Jayanti LIVE: आज हनुमान जयंती, ठिकठिकाणी उत्साह, प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा..
Pune Hanuman Jayanti : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातदेखील हनुमान जयंती साजरी केली जातेय. पोलीस ठाण्यात असलेल्या हनुमान मूर्तीची पोलीस नित्यनेमाणे पूजा करतात.
Gondia Hanuman Jayanthi: गोंदियाच्या गौतम नगर परिसरामध्ये झोपलेल्या हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन.
Sindhududurga Hanuman Jayanti: हनुमान जन्मोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक फुलांनी मंदिर परिसर सजले असून मोठया संख्येने भाविक हनुमान मंदीरात गर्दी करत आहेत. हनुमान जयंती निमित्ताने जिल्हयात सर्वत्र भक्तिमय वातावरणात पाहायला मिळत आहे. वेंगुर्ले शहरातील चार गदा हनुमान मंदीरात सिताफळ, रामफळ आणि हनुमान फळ याची पूजा देखील करण्यात आली.
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिल्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
Buldhana Hanuman Jayanthi 2023: बुलढाण्यातील नांदुऱ्यात जगातील सर्वात उंच हनुमान मुर्ती. सकाळी हनुमंताच्या भव्य मूर्तीला जलाभिषेक करुन उत्सवाची होणार सुरुवात. ट्रस्टकडून आरोग्य शिबिराचेही आयोजन.
Yavatmal Hanuman Jayanthi 2023: यवतमाळचा युवा चित्रकार राहूल गुल्हानेनं पिंपळाच्या पानावर साकारली हनुमानाची कलाकृती. अवघ्या १५ मिनिटांत कलाकृती साकारत दिल्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.
Akola Hanuman Jayanthi: अकोलेकरांचं दैवत असलेल्या तपे हनुमान मंदिरात आज पहाटेपासूनच हनुमान भक्तांनी गर्दी केलीये. जवळपास पावणेपाचशे वर्षांचा इतिहास या मंदिराचा आहेय. या मंदिरात आज भक्तांसाठी प्रसाद म्हणून 501 किलोच्या सुक्यामेव्याचा लाडू बनवण्यात आला आहे. अकोला शहराबाहेर मरघट भागात मोर्णा नदीच्या काठावर हे मंदिर आहेय. वर्षभर येथे हनुमान भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असतेय. अकोल्यातील तपे हनुमान मंदिर परिसरातून हनुमान जयंतीच्या उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी.
Pune Hanuman Jayanthi 2023: पुण्यात देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे... पुण्यातील नवग्रह मारुती मंदिरात हनुमान जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून काल रात्रीपासूनच भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती... तर आज सकाळपासून देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीये..
Sangli Hanuman Jayanthi : देशभरात सध्या हनुमान जयंतीच्या उत्साह आहे.. राज्यभरातही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. सकाळपासून मोठ्याप्रमाणात भाविक दर्शानासाठी येतायत. नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगली जवळच्या तुंगमधील हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे तुंगच्या मारुतीरायाचे मंदिर आहे. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी आज पहाटेपासून मोठी गर्दी केली. तुंग मधील मारुती मंदिरातून उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी...
Kolhapur Hanuman Jayanti: कुस्तीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातदेखील हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे... कोल्हापुरातील कुस्तीच्या तालमींमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. गंगावेश तालमीमध्ये हनुमान जयंतीची तयारी पूर्ण झालीये... कुस्तीच्या आखाड्यात शंकराची पिंड तयार करुन त्याची पूजा करण्यात आलीये..
Amravati Hanuman Jayanti : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे... यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार असून हजारोंच्या संख्येने महिला हनुमान चालीसा पठणाला हजेरी लावणार आहेत... भजन गायक शैलेंद्र भारती हे हनुमान चालीस पठण करणार आहे.. तसेच अमरावतीतील छत्री तलाव परिसरातील 10 एकर जागेत 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती साकारली जाणार आहे... याबाबतची एक चित्रफीत देखील दाखवली जाणार आहे...
पार्श्वभूमी
सूर्याचा घ्यायला गेला घास...
जो वीरांचा आहे खास...
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान... आज हनुमान जयंती... हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते...हनुमान जयंती निमित्तानं अंजनेरी गावातील श्री सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली... तसच या 11 फुटी मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलं.. आज पहाटे वाजत - गाजत मिरवणूक काढण्यातही आली. सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा उत्साहात पार पडला, आणि भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुलं करण्यात आलं. दरवर्षी महाराष्ट्रासह (Maharashtra News) इतर राज्यातून भक्तगण दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमानच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेलाय..
हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)
सकाळी 06:06 AM ते 07:40 AM
सकाळी 10:49 AM ते 12:23 PM
दुपारी 12:23 PM ते 01:58 PM
दुपारी 01:58 PM ते 03:32 PM
संध्याकाळी 05:07 PM ते 06:41 PM
संध्याकाळी 06:41 PM ते 08:07 PM
सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर हनुमानजींच्या समोर बसून त्यांचं ध्यान करा. आता आंब्याच्या पानाने हनुमानजींवर पाणी शिंपडा. हनुमानजींना शेंदूर अर्पण करा. शेंदूर लावल्यानंतर बजरंगबलीला लाल फुलं अर्पण करा. याशिवाय अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल लंगोट अर्पण करा. हनुमान चालिसाचं पठण करा. हनुमानजींना भोग म्हणून खीर अर्पण करा. या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण अवश्य वाचा. हनुमान मंत्रांचा जप करा आणि हनुमानजींची आरती करा. आता हनुमानजींच्या भोग प्रसादाचं सगळ्यांना वाट करा.
हनुमान जयंती 2023 चं महत्व (Importance of Hanuman Jayanti)
राम भक्तांसाठी हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) दिवस खूप खास असतो. श्री रामाचा भक्त हनुमानजींच्या जयंतीला विधीवत पूजा केली जाते. शहरात, गावांत मोठ मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात असा विश्वास आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन म्हटलं जातं.
असं म्हणतात की, जो भक्त हनुमानजीची उपासना करतात ते भय, क्रोध, दु:ख, दोष मुक्त होतो. हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा केली की आपल्याला दुहेरी म्हणजे रामाची आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते. एक अशी ही मान्यता आहे, म्हणजे शिवपुराणात असं म्हटलं आहे की, संकटमोचन हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -