Handicap Special School Will Reopen: सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा आदी येत्या एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले होते. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.
धनंजय मुंडे यांचं ट्वीट-
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा व कार्यशाळा चालवल्या जातात. या शाळांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे कोविड संसर्गाच्या काळात या शाळा बंद होत्या. आता 1 मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
हे देखील वाचा-
- Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...
- Nashik Crime : एक मृतदेह पालघरमध्ये, तर दुसरा नगरमध्ये; संपत्तीवर डोळा ठेवून माजी कुलसचिवांची मुलासह हत्या
- Kirit Somaiya on Sanjay Raut : राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या म्हणाले, हम तो डुबेंगे तो ठाकरे तुम्हे ले डुबेंगे...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha