Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार हे आज दिवसभर सांगली जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. याचबरोबर अर्धे मंत्रिमंडळ सुद्धा आज विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगलीत येत आहे. पवारांच्या दौऱ्याची सुरुवात शिराळा येथून होणार आहे.  आज शिराळा येथे भाजप नेते, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. त्यानंतर भव्य शेतकरी मेळावा देखील होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार हे उपस्थिती लावणार आहेत. तसेच विजयनगरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण पवारांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचा भूमिपूज सोहळासुद्धा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.


दरम्यान, शिराळाचा कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार हे सांगलीत हेलिकॉप्टरने येमार आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य संजीवनी उपक्रमांतर्गत स्मार्ट पी. एच. सी.चा शुभारंभही आज होणार आहे. तसेच सांगलीतील नाना नानी पार्क आणि याच पार्क मधील निसर्गप्रेमी शिवाजीराव ओऊळकर सभागृहाचे उद्घाटनही शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विजयनगर भागामधील पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजनसुद्धा शरद पवार  यांच्या हस्ते होणार आहे. शेवटी विजयनगरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पणही पवारांच्या हस्ते होणार आहे. 


या नेत्यांची उपस्थिती राहणार
शरद पवार यांच्या या कार्यक्रम दौऱ्यातनिमित्त राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोबत असणार आहेत. याशिवाय  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदींसह जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: