Gunaratna Gsadavarte : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची आज 18 दिवसानंतर जेलमधूल सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर पडताच सदावर्ते यांनी हम है हिंदुस्थानी अशी घोषणाबाजी केली. शिवाय आपला कैदीनंबर सांगत आपण कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी असल्याचे म्हटले आहे. 


गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरू होते. परंतु, एवढे दिवस शांततेत चाललेल्या आंदोलनाला गेल्या काही दिवासंपूर्वी हिंसक वळण लागले आणि या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी हिंसक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी  शरद पवार यांच्या घरावर चपल्या आणि दगड फेक केली. त्यामुळे या आंदोलकांना चिथवल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली. परंतु, या अटकेनंतर त्यांच्या आडचणी आणखी वाढत गेल्या. राज्यात विविध ठिकाणी त्यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांखाली गुन्हे दाखल झाले. त्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून त्यांना या कोठडीतून त्या कोठडीत जावं लागंल होतं. अखेर आज 18 दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला.  


गुणरत्न सदावर्ते यांची आज सांयकाळी मुंबई येथील आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येताच सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. "देशभरातील कष्टकऱ्यांसाठी लढणारा मी हिंदुस्तानी वकील आहे. माझा कैदीनंबर  5681 होता. कष्टकऱ्यांसाठी लढणारा मी कैदी आहे." असे सदावर्ते यांनी म्हटले. 


माझ्या सांगण्यामुळे एसटी कामगार कामावर परतले
सदावर्ते म्हणाले, "जे एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत, ते कोणाच्या सांगण्यावरून नाही तर मी सांगितल्यामुळे कामावर परतले आहेत. मी त्यांना जेलमधू कामावर परतण्यात सांगितले होते."


18 दिवसात फक्त पाणी प्राशन केलं
"सरकारला जे काय करायचं ते करू द्या आपण आपलं तत्व सोडायचं नाही असं मी ठरवलं होतं. जेलमध्ये गेल्यापासून आजपर्यंत मी फक्त पाणी प्राशन केलं आहे, असे सदावर्ते यांनी सांगितले. 


माझी हत्या होईल
दरम्यान, सदावर्ते यांनी आपली हत्या होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. "माझी हत्या झाली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  योग्य ती पावली उचलावीत अशी मागणी यावेळी सदावर्ते यांनी केली.