मुंबई : राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येत आहे, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा स्पष्ट शब्दात इशारा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Hindi Compulsion) यांनी दिला आहे. हिंदी ही काही राष्ट्र भाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती करु नये असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जर हिंदी सक्ती करणार असाल तर दक्षिण भारतातही ती लागू करणार का असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. मात्र, राज यांच्या या इशाऱ्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणालेत गुणरत्न सदावर्ते?

एबीपी माझाशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सगळ्यात अगोदर राज्य शासनाने जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची उपलब्धी करून दिली त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करतो. विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी जे ट्विट केल ते लोकांच्या विरोधी आहेत का? मी त्यांच्या भूमिकेची निंदा करतो, त्यांचा निषेध करतो. तुमच्या धमक्यांना आम्ही संविधान उत्तर देऊ, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. 

तुमच्या वैयक्तिक खिशातून पैसे जाणार का?

या देशाची संस्कृती आहे, जेव्हा लहान वयात जर मुलांना ज्ञान मिळवण्याची संधी मुलांना उपलब्ध होत आहे, तर तुम्ही त्याला विरोध का करत आहेत?  तुमच्या वैयक्तिक खिशातून पैसे जाणार आहेत का? हे दु:ख नेमकं कशाचं आहे? नेत्यांची लेकरं इंग्रजी शाळेत शिकणार आणि सामान्यांच्या लेकरांनी काय स्थानिक शाळेत शिकायचं का? देख लेंगे राज ठाकरे कितना है दम, मुलांना नवीन संधी आहे, कोणी त्यात अडथळा आणू नये, राज ठाकरे यांचा निषेध करतो, त्यांनी काही केलं तर न्यायालयात आम्ही आवाज उठवू, पालकांसोबत राहु हे डंके की चोट पे सांगतो असंही पुढे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

शासनाचा निर्णय होतो कौतुकास्पद 

विद्यार्थ्यांचा बालकांचा बाळगोपाळांचा सर्वांगीण विकास हे राज्य शासनाचा उद्देश आहे. अधिक अधिक मुलांना भाषा शिकायला मिळाव्यात आणि देश हिताच आहे. देशाच्या अखंडत्वासाठी त्याचबरोबर राष्ट्रहितासाठी देखील हे महत्त्वाचं आहे. या निर्णयाचा स्वागत आणि राज्य शासनाचा अभिनंदन या दोन्ही गोष्टी हिंदुस्तान मजदूर संघ आणि कष्टकरी जनसंघाच्या वतीने आम्ही आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन अभिनंदन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही या निर्णयाचा स्वागत केलं आहे. पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा शिक्षण अनिवार्य करणे हे शासनाचा निर्णय होतो कौतुकास्पद आहे. मानवी जीवनामध्ये एक अधिकची शासनाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली संधी आहे आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ती शिकायला मिळत आहे. आशिया खंडामध्ये सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जात असेल तर ती हिंदी आहे. तुम्ही गल्फमध्ये जा, दुबई, वेगवेगळ्या शहरांमध्ये चीन सारख्या देशांमध्ये सुद्धा थोडी थोडी हिंदी बोलली जाते. हिंदी ही सगळ्यांना समजणारी भाषा आहे, केंद्र सरकारची कम्युनिकेशन लँग्वेज देखील हिंदी आहे. अनेक राज्यांमध्ये हिंदी बोलतात अनेकांना ती समजते त्यामुळे या भाषेमुळे विद्यार्थ्यांना देखील ही भाषा शिकण्यासाठी मिळत आहे हे अत्यंत आनंदी क्षण आहे, असेही पुढे पुनरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. 

ठाकरेंच्या विरोधावर सदावर्तेंनी हिंदीत उत्तर देताना म्हटलं

राज ठाकरे यांना हिंदीत उत्तर देतो ते त्यांना ऐकावे लागेल. कारण या देशात लोकशाही आहे. राज ठाकरेंना मी हे सांगू इच्छितो की, राज्य शासनाने पाचवीपर्यंत मुलांना हिंदी लिहिण्यासाठी आणि शिकण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने धमकावून किंवा इशारा देणे याची आम्ही निंदा करतो, त्याचा निषेध करतो. राज ठाकरे यांच्या मनसेसारख्या अनेक पार्ट्या रजिस्टर आहेत. अशा पार्ट्या गल्लीबोळात पाहायला मिळतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलांच्या प्रगतीच्या मध्ये याल. मुलांच्या पंधरा वर्षापर्यंत त्यांना अधिकाधिक भाषा शिकता येऊ शकतात. ते चांगल्या प्रकारे शिकू शकतात. त्यासाठी तुम्ही विरोध का करत आहात. या सर्वांसाठी तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देणार आहात का? असा सवाल देखील पुनरत्न सदावर त्यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांच्या उग्र विचारांच्या आम्ही निषेध करतो, राज ठाकरे यांच्या यांना आम्ही संविधानाने रोखू त्याचबरोबर आम्ही या निर्णयाच्या मध्ये कोणाला येऊ देणार नाही असंही सदावर्ते पुढे म्हणालेत. 

त्याचबरोबर राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे, मनसे स्टाईल आंदोलन वगैरे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मी सांगतोय आहे. या स्टाईलने, त्या स्टाईलने चालणार नाही. भारताच्या संविधानाने प्रमाणे इथे एकच गोष्ट चालेल. आपला देश इस्लामिक राष्ट्र नाही. जे मुघलांनी केलं होतं, ते इथे चालणार नाही. ज्याप्रमाणे तालीबानी बोलतात. हे नाही करायचं, ते नाही करायचं, अशा गोष्टी इथे खपवून घेतल्या जाणार नाही. हा देश आहे आणि त्याला अखंड ठेवण्यासाठी हिंदी भाषेचा आम्ही मनापासून स्वागत करतो आणि राज ठाकरे यांच्या इशाराचा निषेध करतो. राज ठाकरेंना संविधानाच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देण्याचा आम्ही आव्हान देतो आहे, असंही पुढे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

राज ठाकरेंचा अत्यंत बालिश विचार आहे. क्रांतिकारी जन्मावा पण शेजाऱ्याच्या घरात, म्हणजेच आपली मुलं शिकावी इंग्रजीच्या शाळेत आणि गरिबांची, मजुरांची, शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांची मुले शिकावीत ती म्हणजे स्थानिक भाषेच्या शाळेत. त्यामुळे राज ठाकरे लक्षात ठेवा, हिंदी भाषा मुलांना शिकता येणार आहे. ती शिकायला विरोध का करत आहेत. तुम्ही तुमच्या अकाउंट मधील पैसे देणार आहात का? हिंदी शिकवण्यासाठी, आमच्या कष्टकऱ्यांची मुलं टायपिंग शिकतात. अनेक ठिकाणी काम करण्याची वैश्विक संधी निर्माण व्हावी यासाठी मुले अनेक भाषा शिकतात, देशातील अधिक तर राज्य हिंदी भाषा समजू शकतात आणि आपणच आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणालेत, हिंदी पत्रव्यवहारांची भाषा असू शकते. मग पत्र व्यवहाराची भाषा समजण्यासाठी ज्ञान लागतं की नाही ते ज्ञान नसेल तर ती भाषा समजू शकेल का? असा प्रश्न सदावर्तेंनी उपस्थित केला आहे. 

ज्ञान हे ईश्वर आहे. ज्ञानाच्या जे आड येईल तो ज्ञानाचा शत्रू आहे आणि राज ठाकरे मला सटकली वटकली म्हणायचं नाही. जो कोणी ज्ञानाच्या आड येईल, तो आमचा शत्रू असेल. त्या शत्रूला आम्ही संविधानिक भाषेने उत्तर देऊ. शत्रूला टाळ्यावर आणण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या संविधान प्रेमी नागरिकांवर आहे. आजकाल मुलं अनेक भाषा शिकण्यासाठी कोर्स करतात. हे सरकार विद्यार्थ्यांचं आहे, सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात जाणार नाही. मला वाटतं राज ठाकरे यांना हिंदू शब्दाची व्याख्या आणि हिंदू या शब्दाचा लिटरेचर हे पुन्हा वाचन करण्याची गरज आहे. आमचा कोणालाही सार्वजनिकपणे अपमान करण्याचा विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी भाषिकांच्या आहेत का? नाहीत, तर ते देशभरातील सर्वांचे आहेत. ते कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं राज ठाकरे यांच्या बालिश विचार याच्यापुढे आता प्रतिक्रिया द्यावी की नाही असाही माझ्याकडे प्रश्न आहे.  

राज ठाकरे बँकेप्रमाणे हिंदीबाबतही माघार घेतील 

राज ठाकरे यांनीही बँकांमध्ये हिंदीची गोष्ट केली होती, त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी असाच विचार मांडला होता, त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रात काय लिहिलं होतं, उदय सामंतांच्या भेटीनंतर त्यांनी पत्र दिलं त्यामध्ये माघार घेतली होती. त्यानंतर आता देखील कोणतीही आई, वडील कोणाचाही भाऊ-बहीण कोणीही हिंदी भाषेच्या विरोधात जाणार नाही, अशावेळी राज ठाकरेंच्या सोबत कोणी उभं राहणार नाही. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरही स्वतः राज ठाकरे यांना पत्र लिहून सांगावे लागेल की, हे आंदोलन देखील ते थांबवत आहेत. कारण ही परंपरा राहिली आहे, असंही पुढे सदावर्तेंनी म्हटलं आहे.