How to Identify Alphonso Mango : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हणजे हिंदू धर्माचं नवीन वर्ष. या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. छान गुढी उभारून श्रीखंडपुरी किंवा पुरण पोळी असा नैवेद्य दाखवला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी हापूस आंब्याची पहिली पेटी (Hapus Mango) खरेदी करण्याची ही काही ठिकाणी परंपरा आहे. हापूस आंबा (Alphonso Mango) राज्यात किंवा देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. आंब्याची पहिली पेटी आणि गुढीपाडवा यामुळे हापूस आंब्यांची किंमत जास्त असते. अशावेळी बाजारात हापूस आंबा सांगू ग्राहकांना ड्युपलिकेट हापूस आंबा विकला जातो.


अस्सल हापूस ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या


अलीकडे हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे. बाजारात देवगड, रत्नागिरी हापूस असं सांगून ग्राहकांची फसवणूक केली जाते. यंदाचा आंब्यावर पावसाचं सावट आहे. अवकाळीमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला परिणामी यंदा हापूस आंब्याचं उत्पादनही कमी झालं आहे. कोकणातून आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. पण याची किंमत जास्त आहे. याचा फायदा घेत ग्राहकांना ड्युपलिकेट हापूस आंबा विकण्याचा प्रकार बाजारात घडत आहे.


यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी


यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट (Mango production) झाली आहे. मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी झालं आहे. कारण वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झाला आहे. कोकणातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट (Mango Production) झाली आहे. दरम्यान, हापूस खरेदी करताना नीट तपासून घ्या आणि हापूस आंब्याच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ देऊ नका.


बाजारात हापूस आंबा खरेदी करताय?


उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशावेळी बाजारात थंड फळं मिळतात. यासोबचत आता फळांचा राजा आंब्यानेही बाजारात एंट्री घेतली आहे. आंबाप्रेमी आणि हापूस यांचं वेगळं नातं आहे. कोकणातला हापूस म्हणजे अस्सल आंबा असं गणित आहे. शंभर टक्के अस्सल रत्नागिरी किंवा देवगड हापूस ओळखाल हे जाणून घ्या. तुम्ही बाजारात हापूस आंबा खरेदी करणार असाल तर खाली दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि मगच आंबा खरेदी करा.


अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा?



  • अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो. 

  • अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध वेगळा असतो.

  • हापूस आंब्याची साल पातळ असते.

  • हापूस बॉटल ग्रीन रंगाचा असतो, इतर आंबे बेलग्रीन रंगाचे असतात.

  • हापूस आंबा कापल्यावर आतून केशरी रंगाचा असतो. ड्युपलिकेट हापूस आतून पिवळ्या रंगाचा असतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Happy New Year : 2023 मध्ये 'या' दिवशी आहे हिंदू नववर्ष, इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर...