Gudi padwa 2022 Live : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उभारली गुढी; 'शिवतीर्था'वर सणाचा उत्साह
Gudi Padwa 2022 : हिंदू धर्मात गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
Raj Thackeray on Farmer sucide : शेतकऱ्याच्या हत्या अद्याप संपलेल्या नाहीत. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागणार नये, हा खरा राज्यकर्ता असतो. असे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले आहे. परंतु आता आमच्याकडे शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप, शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे.
Raj Thackeray on Sachin Waze : सचिन वाझे शिवसेनेत होते त्यांनी अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला. परंतु त्याचे उत्तर आजपर्यंत उत्तर देशाला आजपर्यंत मिळाले नाही. जनता सगळा विसरते आणि याचा फायदा घेतला जातो. मूळ विषय बाजूला ठेवला जातो. जगातील सर्वात मोठ्या उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याची हिम्मत कशी होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी हळूहळू मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. 'राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवा धारी' अशा पद्धतीचे पोस्टर देखील झळकले आहेत
महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!! हे नववर्ष आपल्याला सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच सदिच्छा
Navi Mumbai Gudi Padwa : तब्बल 2 वर्षांनंतर गुढीपाडवा उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येतोय. नवी मुंबईतही गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेतर्फे भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. हिंदू नववर्षाची भव्य गुढी उभारत ढोल ताश्यांच्या गजरात लेझीमच्या तालावर नाचत स्वागत यात्रा काढण्यात आली. 2 वर्षानंतर निघालेल्या स्वागत यात्रेत नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर औरंगाबादमध्ये चारचाकी गाडी खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. आपल्या स्वप्नातली कार खरेदी करण्यासाठी औरंगाबादच नाही तर औरंगाबादच्या आसपासच्या जिल्ह्यातूनही आज औरंगाबादेत नागरिक आलेले आहेत. औरंगाबादेत वेगवेगळ्या शोरूम मधून चारशे ते पाचशे चारचाकी गाड्या आज वितरित केल्या जाणार आहेत.
Latur Gudi Padwa Rally : लातूरमध्ये महिला डॉक्टरांची गुढीपाडव्या निमित्त मोटरसाइकल रॅली... इंडियन मेडिकल असोशिएशनच्या महिला डॉक्टरांनी लातूर शहरात पारंपारिक वेशभूषा परिधान करत मोटारसायकल रॅली काढली, 100 हून अधिक डॉक्टरांनी घेतला सहभाग
Jalgaon Gudi Padwa News : साडेतीन मुहूर्त पैकी प्रमुख एक मुहूर्त असलेल्या गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जामनेर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाजपा नेते गिरीश महाजन हे गेल्या तीस वर्षांच्या पासून अखंड पने सहभागी झाले. आज देखील जामनेर शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत गिरीश महाजन हे सहभागी झाले
karjat JamKhed News : गुढीपाडव्याच्या निमित्त कर्जत - जामखेड येथे श्रमदानाची गुढी उभारण्यात आली... 'समृद्ध गाव संकल्प 2.0' या उपक्रमा अंतर्गत कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्रात आध्यत्मिक, शिक्षण, महिला आणि बालविकास, जल संधारण, वृक्ष लागवड, मूलभूत सुविधा, आरोग्य अशा 7 विषयांवर लोक सहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने ग्राम समृध्दीचा संकल्प पुढे नेला जात आहे...आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून हे संकल्पना राबविली जात आहे...गुढीपाडव्याच्या निमित्ताने कर्जत आणि जामखेड येथे जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे...यात नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. दिल्ली मध्ये देखील मराठी माणूस मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा करत आहे. सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बहुतांश खासदार दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील खासदार देखील सध्या दिल्लीत असल्याने दिल्लीत गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा होतोय. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे की, देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणारा भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतं. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे, अशा शब्दात बापट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उभारली गुढी; 'शिवतीर्था'वर सणाचा उत्साह
Nagpur : Devendra Fadnavis यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, नागपूरात नागरिकांमध्ये उत्साह
Girgaon Gudipadwa 2022 : गिरगावमध्ये ढोल-ताश्यांचा गजर, गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदाला तोटा
Dadar Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्याचा नागरिकांमध्ये उत्साह, शोभायात्रेत अबाल-वृध्दांचा सहभाग
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुढी पूजन , भुजबळ फार्मवर होणार गुढी पूजन.. भुजबळ आणि त्यांची नात भुवनेश्वरी समीर भुजबळ यांच्या हस्ते गुढी पूजन
ढोल पथकाचे होणार सादरीकरण
हिंदू नववर्ष स्वागत समिती समोर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सेनाभवन समोर गुढीचे पूजन, या कार्यक्रमाला आशिष शेलार, संदीप देशपांडे ,नितीन सरदेसाई पाडव्यानिमित्त एकत्र
Buldhana News : आज मराठी नवं वर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मलकापूर शहरात महिलांनी बाईक रॅली काढत नवं वर्ष साजरं केलं , सकाळीच शहरातील मुख्य मार्गावरून महिलांची ही बाईक रॅली आकर्षणाचा विषय बनली होती.जवळपास शंभराच्या वर बाईक स्वार महिलांनी भगवे फेटे परिधान करून आज गुढीपाडव्याचा आनंद लुटला.
“कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे...” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया... निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया..., असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.
Ajit Pawar Gudi Padwa : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ' देवगिरी ' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
gudi padwa at alandi pune : गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त देवाची आळंदी सजली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला रंगीबेरंगी फुलांची सजावट करत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. भाविकांना ही सजावट आकर्षित करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्री ज्ञानोबांच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. कोरोना संकट आटोक्यात आल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येणार आहे. स्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची मुख्य मंदिरात गर्दी झालीय.
Ahemadnagar Gudi Padwa : महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाल्यानंतर प्रथमच आलेला सण गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे, यानिमित्त अहमदनगर शहरातून चैत्र शोभायात्रा काढण्यात आली आहे... या शोभायात्रेमध्ये पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला, युवक युवती यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय...यातच चिमुकल्यांची दिंडी, बुलेटवरील महिला,सायकल रॅली काढण्यात,छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले चिमुकले, बैलगाडीवरील शेतकरी या शोभायात्रेत सहभागी झाले...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
Gudi Padwa In Dadar Mumbai - दादरमध्ये बाळगोपाळांची विविध रुपं...
Devendra Fadnavis In Nagpur : गुढी पाडवा नवीन चैतन्य आणि ऊर्जा देणारा, कोरोना संकटानंतर आज मोठ्या उत्साहात पाडवा साजरा होत आहे. आजपासून राम नवमीचा उत्साह दिसून येत आहे- देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde Gudi Padwa : मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं, येणाऱ्या काळात निर्बंध मुक्त जीवन जगता यावे यासाठी सर्वांना काळजी घ्यावी. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा..
'
Gudi Padwa 2022 : आज गुढी पाडवा आहे. आजपासून मराठी नवीन वर्षाचा सुरुवात होते. या नवीन वर्षाच्या सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा. आजच्या या शुभ सकाळी थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या वर कळसावर गुढी उभारण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर भाविक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गुढी पाडवा साजरा होत आहे. मंदिराच्या मुख्य कळसाखाली पहाटे गुढी उभारण्यात आली. देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव देखील करण्यात आला आहे.
Mumbai Metro 7 And Mumbai Metro 2A : गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
Pandharpur Vitthal Mandir Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने विठुराया आणि भक्तांचे अंतर संपवले आहे. विठ्ठल भक्तांसह शेकडो लहान मोठ्या लहानमोठ्या व्यापाऱ्यांना विठ्ठल पावला आहे. कोरोनामुळं गेल्या काही काळापासून बंद असलेलं थेट दर्शन आजपासून सुरु होतंय. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे. या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे.
गेले दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विठुरायाचे बंद असलेले पायावरील दर्शन व्यवस्था आज गुढी पाडव्यापासून सुरु झाली असून भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अंतर संपले आहे. आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठुरायाच्या चरणावर दर्शन घेणाऱ्या पहिल्या भाविकांच्या अंगावर पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.
Nashik Gudi Padwa : नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या साक्षी गणेशला वंदन,
भद्रकली परिसरातील साक्षी गणेश मंदीर समोर कथथक नृत्यांगनाची गणेश वंदना
, ताल लयबद्ध पदन्यास
Kolhapur gudi padwa : गुढीपाडव्याच्या निमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे...मराठी वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करावी यासाठी भाविकांचे प्रयत्न सुरू असतात...आणि म्हणूनच आजच्या दिवशी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे...कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक देवीच्या दर्शनासाठी आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत...
पार्श्वभूमी
Gudi Padwa 2022 : गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साडरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते. खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.
पाडव्याच्या मुहूर्तावर साई पालख्यांचे प्रस्थान
गेले दोन वर्ष कोरोनामुळे साई भक्तांना साई पालखी काढता आल्या नाहीत. मात्र यंदा महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कमी झाल्याने सरकारने निर्बंध उठवले आहेत. यामुळे शेकडोच्या संख्येने राज्यभरातील साईभक्त साई पालखीत पुन्हा शामिल झाले आहेत. पुढील दहा दिवस हे साई भक्त पायी शिर्डीला पोहचणार आहेत. साईभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. विविध देखावे, साई पालखीसह साई नामाचा जयघोष करीत हे साईभक्त शिर्डीला रवाना झाले आहेत.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार
दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ''हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aryan Khan Case : मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
- Coronavirus : भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा 'हा' मोठा दावा, काय म्हणाले जाणून घ्या?
- Supreme Court : अबब! केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित 35000 हून अधिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -