सोलापुरात महिला ग्रामपंचायत सदस्याची पेटवून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2016 06:12 AM (IST)
सोलापूर : सोलापूरमध्ये महिला ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आली आहे. मैनाबाई हरिदास कोरे असं मृत महिलेचं नाव आहे. पतीनेच तिची पेटवून हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैनाबाई हरिदार कोरे या पाकणीच्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. 17 जुलै रोजी पती हरिदास कोरेने घरगुती कारणावरुन मैनाबाईंना पेटवून दिलं होतं. या घटनेत भाजलेल्या मैनाबाईंना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र प्रकृती गंभीर असलेल्या मैनाबाई कोरेंचं गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मैनाबाईंचा पती हरिदासला दारुचं व्यसन होतं. पोलिसांनी या प्रकरणी हरिदासवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.