Gram Panchayat Election Voting Live Updates : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान  (Maharashtra Gram Panchayat Election)  होणार आहे.  राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Oct 2022 08:29 PM

पार्श्वभूमी

Gram Panchayat Election Voting Live updates : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान  (Maharashtra Gram Panchayat Election)  होणार आहे.  राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार...More

Gram Panchayat Election: विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

 विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.