Sambhajiraje Chhatrapati : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) स्वराज्य संघटनेला (Swarajya Sanghatna) लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी व्यक्त केले आहे. स्वराज्य संघटनेनं राजकारणात यावं अशीच लोकांची इच्छा असल्याचं दिसून येत आहे. यातून अधिक जोमानं काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत असल्याचे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. जे लोक आमच्यासोबत आहेत आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू असेही संभाजीराजे म्हणाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर (Gram Panchayat Election) संभाजीराजे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये स्वराज्य संघटनाही मैदाना उतरली होती. पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षीत यश मिळालं असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेचे 89 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंच निवडून आले असल्याची माहिती संभाजीराजेंनी ट्वीट करत दिली आहे. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर, अहमदनगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वराज्य संघटनेला यश मिळाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
भाजपचा सर्वांधिक ग्रामपंचायतीवर विजय
राज्यात निवडणूक लागलेल्या 7 हजार 682 ग्रामपंचायतीपैकी भाजपने एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादी राँग्रेसने 1 हजार 215 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी (18 डिसेंबर) मतदान झालं होतं. त्यानंतर काल (20 डिसेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने 2 हजार 23, राष्ट्रवादीने 1 हजार 215, शिंदे गट 772, काँग्रेसने 861, ठाकरे गट 639 तर इतर पक्षांनी 1 हजार 135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
भाजपकडे सर्वाधिक सरपंच
भाजप 1 हजार 873
शिंदे गट 709
ठाकरे गट 571
राष्ट्रवादी 1007
काँग्रेस 657
इतर 967
निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायती - 7 हजार 682
एकूण सदस्य संख्या- 65 हजार 916 (त्यापैकी बिनविरोध विजयी सदस्य- 14 हजार 028).
निवडणूक झालेल्या सरपंचपदांच्या एकूण जागा- 7 हजार 619 (बिनविरोध विजयी सरपंच- 699)
एकूण 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या: