Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली, तरी हा जीआर स्वीकारला काय आणि फेटाळला काय, याचा काहीही फायदा मराठा समाजाला होणार नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेमध्ये मराठा आरक्षणावर मंथन करण्यात आले. यामध्ये मराठा आरक्षण अभ्यासक तसेच तज्ज्ञांनी सहभाग घेतला. या गोलमेज परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदेशीर आणि घटनात्मक पैलूंवर चर्चा करण्यात आली. या परिषदेसाठी जवळपास शंभर अभ्यासक एकत्र आले होते. दरम्यान, या परिषदेनंतर मराठा आरक्षण अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी या आदेशासंदर्भात बोलताना सांगितले की, या जीआरचा फायदा होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दोन सप्टेंबर रोजी शासन आदेश निर्गमित केला आहे, पण त्या चॅलेंज करणाऱ्या विरोधातील जनहित याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता या संधीचा फायदा घेऊन शासनाने यामध्ये आवश्यक आहेत ते बदल करावेत आणि हे प्रमाणपत्र व्हॅलिडेट होईल, अशा उपायोजना कराव्यात अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली. 

Continues below advertisement

नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलिडेट करून द्यावे

लाखे पाटील यांनी सांगितले की आम्ही सहा मुलांची नावे जाहीर करत आहोत. त्या मुलांना एक महिन्यांमध्ये नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलिडेट करून द्यावे, हे आमचं सरकारला चॅलेंज असल्याचं संजय लाखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शिंदे समितीकडून समिती स्थापन होण्यापूर्वी नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय किती प्रमाणपत्र वितरित करण्यात आली याची सुद्धा आकडेवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली. 

लक्ष्मण हाकेला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल

त्यांनी पुढे सांगितले की कायदा आणि सुव्यवस्था राखणे जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. गृहमंत्री म्हणून ही जबाबदारी देवेंद्र फडणीस यांचीच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी दोन समाजामध्ये तेढ वाढली पाहिजे या पद्धतीने मराठा समाजाच्या भगिनींच्या संबंधाने प्राध्यापक लक्ष्मण हाके वक्तव्य करत आहे. ते पुढे म्हणाले की मराठा ओबीसीमध्ये वाद नसताना मराठा मराठा मुलीचे आंतरजातीय विवाह असे तो म्हणत असल्याचं ते म्हणाले. समतेचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी हा प्रयोग केला आहे. जे स्वेच्छेने करतील त्यांनी ते करावं. मात्र, एका समाजाला टार्गेट करण्यासाठी हे करू नये, पण लक्ष्मण हाके हे करत असल्याचे त्यांनी सांगितलं. इथून पुढे लक्ष्मण हाकेला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, त्याचं वक्तव्य जातीय तेढ वाढवणारे असून व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या