बारामती : इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) चप्पलफेक करण्यात आलीये. ओबीसी (OBC) एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा (Maratha) समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळंत आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं स्पष्टीकरण देखील मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यंच्यावर गुन्हा नोंद करण्याची मराठा आंदोलकांनी यावेळी मागणी केलीये. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला.  ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. 


दरम्यान गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. तसेच पडळकरांचीच माणसंच आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. इंदापुरात अण्णा काटे यांच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी पडळकर गेले असल्याची माहिती समोर आली होती. पण तिथेच दुधासाठी देखील उपोषण सुरु होते. त्यामुळे पडळकर नक्की कोणत्या उपोषणासाठी आले होते, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं मराठा समाजाने स्पष्ट केलंय. 


ओबीसी एल्गार मेळाव्यातून पडळकरांचा हल्लाबोल


ओबीसीच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी ठेवली पाहिजे. आज सरसकट कुणबी दाखले देणे सुरू केलं आहे. अनेक जातीच्या लोकांना अनेक हेलपाटे घातले तरी आम्हाला पुरावे मागत आहेत. भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस कोणी वाकडा करु शकत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल केला होता. 


मराठा आंदोलकांचं म्हणणं काय?


जेथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याठिकाणी मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरु होते. त्याठिकाणी गोपीचंद पडळकर यांना येण्यास मराठा समाजाकडून विरोध करण्यात आल्या. त्यांना परत जाण्यास मराठा समाजाकडून सांगण्यात आलं. पंरतु आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नाही, चप्पलफेक केली नाही. त्यांच्याच माणसांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली असल्याचं यावेळी मराठा आंदोलकांनी म्हटलं. त्यामुळे या घटनेमध्ये पोलीसांच्या तपासाअंती संपूर्ण प्रकार उघकीस येईल. तसेच यावर पडळकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. 



हेही वाचा : 


Manoj Jarange : मराठ्यांनो मुंबईला जाण्यासाठी तयार रहा, अखेर मनोज जरांगे बोललेच; सरकारची अडचण वाढणार