सोलापूर : सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारांचा शोध सुरु असतानाच सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. दोन तरुणांनी हातात दगड घेऊन कार्यालयाची काच फोडण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.
राष्ट्रवादी मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आलीय; गाडीवरील दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका
शरणू हांडे, सोमनाथ घोडके अशी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोघा तरुणांची नावं आहेत. हे दोघे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. काल पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचललं आहे. आम्ही पळून न जाता स्वतः पोलीस स्टेशनला जातोय, असं शरणू हांडे याने सांगितलं. काल पडळकर यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मोठा दगड घालून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्या निशेधार्थ आम्ही राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, असं शरणू हांडेनं म्हटलं आहे.
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक, पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक
सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापुरातील मड्डी वस्ती इथे हा प्रकार घडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.
'शरद पवारांना मोठा नेता मानत नाही', पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची भाषा घसरली
पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखलआमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली त्या तरुणांचे अमित सुरवसे आहे. अमित हा 25 वर्षीय असून त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत अमित हा लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. अमित हा स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने या आधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात अमित याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल. राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांसोबत अमित याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र त्याच्याकडे राष्ट्रवादीचे कोणतेही पद नसल्याचे देखील कळते आहे.
Special Report : 'टीकेचा छंद, गोपीचंद...', वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि गोपीचंद पडळकर