Gopichand Padalkar : भाजप नेते गोपीचंद पडकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बोलताना भडक प्रतिक्रिया दिली आहे. मागील दोन वर्षापासून संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरचं हे ठिकाणवर येतील, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
दीड दमडीच्या पगारावर आपण किती बोलावं? महाराष्ट्राला किती उपदेश करावेत? संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळलेलं पात्र आहे. शिवसेनेनं एक बैठक घेऊन यांना रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी, असेही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकारांच्या यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांची हीच ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेला आहे. हे कोणत्या आंदोलन कधी गेले ? पगार पुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं, असा घणाघात पडळकर यांनी केलाय.
एसटी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते परिवहन विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो. पण तसा प्रस्ताव आला नव्हता.
अनिल परब हे टेबला खालचं मांजर आहे – सदाभाऊ खोत
एसटी आंदोलनाची बाजू घेत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अजूनही आम्हाला निमंत्रण दिले नाही. अनिल परब हे टेबलाखालचं मांजर आहे. त्यामुळे ते फार काही चांगला निर्णय कामगारांच्या बाजूने घेतील असं मला वाटत नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. जे सरकार आधीपासूनच बदनाम आहे. त्याला काय बदनाम करु. काळ्या तोंडाला कोणी काळ फासत का ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
एसटी महामंडळं सरकारमध्ये विलिनीकरणं चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हवशे, नवशे, गवशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील, असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले. कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, असंही ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha