सातारा : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी साताऱ्यातून आली आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु होणार आहे. शनिवारपासून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. 


सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल, जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?


महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत एन्ट्री दिली जाणार आहे. प्रांताधिकारी संगिता राजापुरे-चौगुले यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


Maharashtra Corona Cases : राज्यात आज दिलासादायक आकडेवारी.. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक  


सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल, जिल्ह्यात काय सुरु, काय बंद?


सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन उद्यापासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आकडेवारी कमी झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर हॉटेल 50 टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. 


काय सुरु-काय बंद 


सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश
हॉटेल पन्नास टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी तर 
रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा देण्यास परवानगी
शेती व शेतीविषयक आस्थापने पूर्ण सुरू
बैठका, संस्था सभांना 50 टक्के क्षमतेने मान्यता
व्यायाम शाळांना, जिमला 50 टक्के क्षमतेने मान्यता
चित्रीकरणला परवानगी पण बायोबबलमध्येच
क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच
 क्रीडांगणे, खेळ सूरु पण स्पर्धा नाहीत
धार्मिक स्थळे बंद, कार्यक्रमावर मर्यादाच
बसेस पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
मास्क न घालणाऱ्या दुकानदारांवर दुकान सिलचे आदेश
मास्क न घालता फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड
लग्नाला अवघ्या 25 लोकांनाच परवानगी
तर अंतविधीसाठी 20 लोकांना परवानगी