गोंदियात धावत्या ट्रेनमधून खाली फेकलेल्या महिलेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 05:10 PM (IST)
गोंदिया : गोंदियामध्ये धावत्या ट्रेनमधून महिलेला खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोंदियाच्या मुनडीकोटा रेल्वे स्थानकापासून अर्धा किमी अंतरावर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. हावडाच्या दिशेने जाणाऱ्या हावडा-अहमदाबाद ट्रेनमधून अज्ञात इसमाने महिलेला खाली फेकले. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी जखमी महिलेला पाहिल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसली तरी मृत्यूपूर्वी तिने आपलं नाव पूजा असं सांगितल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.