जळगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीतही झाला आहे. त्यामुळे ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा मानस असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.


सोन्याचे दर तब्बल 850 ते 900 रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 31 हजार 300 रुपये असलेला दर 30 हजार 450 रुपयांवर गेला आहे.

दोनच दिवसांमध्ये साडे आठशे रुपयाने सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा ग्राहकांवर परिणाम झाला आहे. दर आणखी कमी होण्याच्या आशेने नवरात्रीत सोने खरेदी करणारा ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.